वाढत्या उष्म्याने जिवाची लाही लाही!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 एप्रिल 2018

वाढत्या उष्म्याने जिवाची लाही लाही! 

वाढत्या उष्म्याने जिवाची लाही लाही! 

जळगावः उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ झाल्याने जळगावकरांच्या जिवाची लाही लाही होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे चाळिशीच्या खाली गेलेले तापमान पुन्हा वाढले. आज (10 एप्रिल) जळगावचे कमाल तापमान 41 अंशांवर पोहचले असून, कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना रणरणत्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. 
पंधरा दिवसांपासून तापमानात वाढ प्रचंड वाढ झाली असून, या वाढलेल्या तापमानात अंगाची लाही लाही होत आहे. चार- पाच दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत काहीसा गारवा आला होता. शिवाय, 43 अंशांवर पोहोचलेले तापमान देखील चाळिशीच्या खाली आले होते. यामुळे काहीशा उष्णतेपासून दिलासा मिळालेल्या जळगावकरांना पुन्हा उष्णतेचे चटके जाणवू लागले आहेत. पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 
14-1 
सकाळपासूनच उष्णतेच्या झळा 
काही दिवसांपूर्वी वातावरणातील बदलानंतर पुन्हा तापमान वाढले. रविवारी दुपारपर्यंत कमाल तापमान 40 अंशांपर्यंत पोहचले होते. तर आज हे तापमान 41 अंशावर पोहचले. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक रुमाल, गॉगल, शीतपेयांचा आधार घेत आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. 

चौकट 
आठवडाभरातील तापमान 
तारीख.............तापमान 
3 एप्रिल...........41.8 
4 एप्रिल...........42.6 
5 एप्रिल...........42.4 
6 एप्रिल...........41.8 
7 एप्रिल...........39.8 
8 एप्रिल...........40 
9 एप्रिल............40 
10 एप्रिल..........41 
------------- 
 

Web Title: marathi news jalgaon lahi