लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

जळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या भागात शहराच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया झपाट्याने सुरू झाली आहे. महापालिकेने या भागाकडे लक्ष दिल्यास विकासकामांनाही चालना मिळून चांगली वसाहत या भागात विकसित होण्यास वाव आहे. 

जळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या भागात शहराच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया झपाट्याने सुरू झाली आहे. महापालिकेने या भागाकडे लक्ष दिल्यास विकासकामांनाही चालना मिळून चांगली वसाहत या भागात विकसित होण्यास वाव आहे. 

एकीकडे शहरे बकाल होत असल्याचे सार्वत्रिक चित्र असले तरी विविध शहरांमधील काही ठिकाणे, प्रकल्प व योजना त्या शहरांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. जळगाव महानगराची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. शहराचा काही भाग अत्यंत बकाल होत चालला आहे, विविध समस्यांनी शहराला ग्रासले आहे. आर्थिक स्थितीमुळे या समस्या सुटायला तयार नाहीत. मात्र, अशातही काही चांगल्या गोष्टी शहरात घडताना दिसतात. उद्याने, मैदाने, चांगले रस्ते व अन्य पायाभूत सुविधा हे घटक शहराच्या विकासाला सहाय्यभूत ठरतात. शहर विकासात या घटकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. 

लांडोरखोरी उद्यानाचे आकर्षण 
काव्यरत्नावली चौकात जैन इरिगेशनच्या माध्यमातून विकसित केलेले "भाऊंचे उद्यान' या परिसरातीलच नव्हे तर जळगाव शहरातील अन्य भागातील नागरिकांसाठीही पर्वणी ठरले. नूतनीकरण झालेले गांधी उद्यानही नागरिकांच्या पसंतीस उतरले. तर दोन-अडीच वर्षांपूर्वी वनविभागाने विकसित केलेले लांडोरखोरी उद्यान आकर्षण ठरू लागले आहे. 

मोहाडी मार्ग परिसराचा विकास 
जळगाव शहराचा खरेतर चौफेर विस्तार होत असला तरी काही ठराविक भागांमध्ये विस्ताराला बऱ्यापैकी वाव आहे. असाच परिसर म्हणजे मोहाडी व शिरसोली रस्त्याकडील भाग. मोहाडी रस्त्याच्या चहूबाजूंना असलेल्या परिसराला लांडोरखोरी उद्यानामुळे विकासाची दिशा मिळाली आहे. शिरसोली मार्गावर मेहरुण तलावामुळे मोठे बंगले व आकर्षक फ्लॅटच्या स्कीम विकसित होत असताना आता मोहाडी रस्त्याच्या दुतर्फा जमिनी विकसित होऊन इमारती उभ्या होऊ लागल्या आहेत. जळगाव शहरापासून पाच- सहा किलोमीटर अंतरावर हा भाग असला तरी या भागाकडे घरे घेण्याचा कल वाढू लागला आहे. गेल्या दोन- तीन वर्षांत या भागात अपार्टमेंट व घरांच्या बऱ्यापैकी इमारती उभ्या राहिल्या. 
 
पायाभूत सुविधांची गरज 
या भागाचा विकास होत असताना पायाभूत सुविधांची, मात्र पुरेशी उपलब्धता नाही. शहराच्या हद्दीपर्यंत मोहाडी रस्ता दुभाजक टाकून विकसित करण्यात आला. दुभाजकात पथदिव्यांची व्यवस्थाही झाली. मात्र, काही वर्षांतच रस्त्याची दुरवस्था झाली व पथदिवेही बंद झालेत. याच परिसरात काही भागात गटारे आहेत, तर काही भागात नाही. त्यामुळे या संपूर्ण परिसरात पक्के रस्ते, गटारे, पथदिवे, पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्यांची सुविधा झाल्यास हा परिसर आणखी झपाट्याने विकसित होऊ शकेल. 

Web Title: marathi news jalgaon landorkhore mohadi road