गणबोलीचा वारसा नवोदीतांनी पुढे न्यावा : डॉ. नेमाडे

गणबोलीचा वारसा नवोदीतांनी पुढे न्यावा : डॉ. नेमाडे

जळगाव ः खानदेशात अनेक बोली भाषा आहेत. या सर्व भाषांचा आदर आणि प्रत्येकाला अभिमान आहे. प्रत्येक बारा कोसाच्या अंतरावर भाषा बदलत असते. परंतू, लेवा गणबोली भाषा ही दीडशे वर्षांपासून वापरली जात आहे. कामानिमित्ताने बाहेर जाणाऱ्यांना ही बोली जमत नाही. यामुळे दीडशे वर्षांपासूनच्या गणबोली भाषेचा वारसा प्रस्तापित साहित्यिक व नवोदीतांनी पुढे न्यावा; असे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. राम नेमाडे यांनी आज येथे केले. 
लेवा गणबोलीभाषा आणि संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने जळगावात पहिले लेवा गणबोली साहित्य संमेलन आज (ता.24) शहरातील लेवा भवन येथे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. नेमाडे बोलत होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगूरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगबी महापौर सिमा भोळे, स्वागताध्यक्ष डॉ. अरविंद नारखेडे, कादंबरीकार डॉ. राजन गवस, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आशालता कांबळे, पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विभागप्रमुख कवी डॉ. प्रा. मनोहर जाधव, आशिष चौधरी, निमंत्रक डॉ. नि. रा. पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, पीपल्स्‌ बॅंकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, बहिणाबाई चौधरी यांच्या पणती सून स्मिता चौधरी, तुषार वाघुळदे आदी उपस्थित होते. 
डॉ. नेमाडे म्हणाले, की आपली बोलीभाषा पुढे नेण्याचे काम आपल्यालाच करावे लागत असते. मालवणी भाषा केवळ मालवण तालुक्‍यात बोलली जाते; पण एकाच माणसामुळे ती भाषा सातासमुद्रापार गेली पोहचली आहे. तशी लेवा गणबोली भाषेने देखील देशाची सिमा ओलांडली आहे. पण भाषेचा हा वारसा सांभाळणे गरजेचे आहे. लेवा गणबोली भाषेचे संवर्धन आजच्या साहित्य संमेलनातून निश्‍चित होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com