डिजिटायझेशन'ने दुर्मिळ ग्रंथही चिरकाल ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

जळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्रंथालये संपूर्णपणे डिजिटल होऊ लागली आहेत. यामुळेच अलीकडच्या काळात "ई-साहित्य' संकल्पना रूढ होत असून दीर्घकालीन प्रक्रियेत "डिजिटायझेशन'मुळे दुर्मिळ ग्रंथ चिरकाल जपून ठेवता येणे शक्‍य आहे. 

जळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्रंथालये संपूर्णपणे डिजिटल होऊ लागली आहेत. यामुळेच अलीकडच्या काळात "ई-साहित्य' संकल्पना रूढ होत असून दीर्घकालीन प्रक्रियेत "डिजिटायझेशन'मुळे दुर्मिळ ग्रंथ चिरकाल जपून ठेवता येणे शक्‍य आहे. 

ऑनलाईनच्या जमान्यात युवकच नाही, तर ज्येष्ठ देखील स्मार्ट आणि ऑनलाइन झाले आहेत. यामुळेच वाचनालयाकडे युवा वर्गाचे पाय फारसे वळत नाही. शिवाय स्पर्धा परीक्षांकडे अधिक कल आहे. आवश्‍यक माहिती स्वतः:च ऑनलाइन मिळवत असतात. यूपीएससी व एमपीएससी तथा इतर स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास व्यवस्थित व्हावा, तसेच त्यांना हवी ती आवश्‍यक पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका चालविण्यात येतात. म्हणूनच बदलत्या काळानुसार अभ्यासिकांचे स्वरूप देखील बदलले आहे. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे अभ्यास करता यावा, यासाठी आता ऑनलाइन अभ्यास केंद्र तयार करण्यात आले आहे. 

ग्रंथसंपदा जपण्यासाठी सॉफ्टवेअर 
पारंपरिक ग्रंथालय ही संकल्पना आता बाजूला पडत आहे. पारंपरिक ग्रंथालये तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऑनलाइन होत असून, प्रामुख्याने महाविद्यालयांमध्ये याचा वापर अधिक होत आहे. यात प्रामुख्याने ग्रंथसंपदा जपण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे. यामध्ये डी स्पेस व ग्रीन स्टोन या दोन सॉफ्टवेअरचा अधिक वापर केला जात आहे. यामुळे दुर्मिळ ग्रंथ जे प्रकाशित होऊ शकत नाही. अशा ग्रंथांचे डिजिटायझेशन करून जपता येणे शक्‍य आहे. म्हणजेच ग्रंथ अधिक काळापर्यंत जपून ठेवता येणे शक्‍य आहे. शिवाय, "एमएचआरडी' या माध्यमाचा वापर करून नॅशनल डिजिटल लायब्ररी देखील तयार केली जात आहे. 

विद्यापीठाच्या लायब्ररीत थेसीस ऑनलाइन 
ऑनलाइन संकल्पनेवर विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये देखील काम सुरू करण्यात आले आहे. यात पहिला टप्पा म्हणून विद्यापीठाकडील 2015 या वर्षांपासूनचे थेसिस ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आवश्‍यक माहिती व कोणत्याही विषयावरील थेसिस सहज उपलब्ध होत असल्याचे ग्रंथपाल डॉ. अनिल चिकाटे यांनी सांगितले. 
 
"ग्रंथालयांचे डिझिटायझेशन ही संकल्पना नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आता रूढ होऊ लागली आहे. यामुळे ऑनलाईनमध्ये स्वयं शिक्षण पद्धती राबविली जातेय. स्वतः लिब पोर्टल तयार करून याच्या माध्यमातून ग्रंथालय केले.' 
- हितेश ब्रिजवाशी, ग्रंथपाल. 
 

Web Title: marathi news jalgaon library digital