लॉकडाउन'मध्ये खेळाडूंना आत्मपरीक्षणाची संधी : क्रीडाशिक्षक नरेंद्र भोई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

शारीरिक दुरुस्तीसाठी खेळाडूंना घरच्या घरी करता येणारे अनेक व्यायाम प्रकार आहेत. सूर्यनमस्कार, योगासने, उड्या मारणे यासारख्या व्यायामासाठी प्रत्येकाच्या घरात पुरेशी जागा नक्कीच असते. काहींना व्यायाम करण्यासाठी मित्रमंडळी सोबत असावी लागते, तर काही जण प्रशिक्षकांचे मार्गदर्शनाशिवाय व्यायाम करू शकत नाहीत. मात्र या काळात स्वतःला नवीन सवय लावून घेण्याची सर्व खेळाडूंना संधी आहे.

जळगाव  : "करोना'मुळे संपूर्ण क्रीडाविश्व एक प्रकारे बंद पडले असेल, तरी खेळाडूंनी डगमगून न जाता या परिस्थितीकडे आत्मपरीक्षण करण्याची संधी म्हणून पहावे असा सल्ला क्रीडाशिक्षक नरेंद्र भोई यांनी दिला आहे. त्याशिवाय टाळेबंदीच्या काळातही खेळाडूंना स्वतःची मानसिक तसेच शारीरिक तंदुरुस्ती जपता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले. 

क्‍लिक कराः PHOTO कॅरम, बुद्धिबळ खेळून कंटाळलात...मग आता हे खेळ खेळा 
 

जळगावातील नरेंद्र भोई हे काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याशिवाय मल्लखांबचे प्रशिक्षक सुद्धा आहेत. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत स्वतःचे मानसिक तसेच शारीरिक संतुलन बिघडू न देता खेळाडूंनी कशाप्रकारे यावर मात करावी, याविषयी बोलताना नरेंद्र भोई म्हणाले, क्रीडा शिक्षक म्हणून मला नेहमी वाटते की कोणत्याही खेळाडूने त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीकडे संधी म्हणून पहावे. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या मानसिक दृष्टिकोन सकारात्मक असणे गरजेचे आहे. 

आर्वजून पहा जळगावातील उद्योगाची चाके येणार रुळावर;  शंभरावर कंपन्या होणार सुरू
 

शारीरिक दुरुस्तीसाठी खेळाडूंना घरच्या घरी करता येणारे अनेक व्यायाम प्रकार आहेत. सूर्यनमस्कार, योगासने, उड्या मारणे यासारख्या व्यायामासाठी प्रत्येकाच्या घरात पुरेशी जागा नक्कीच असते. काहींना व्यायाम करण्यासाठी मित्रमंडळी सोबत असावी लागते, तर काही जण प्रशिक्षकांचे मार्गदर्शनाशिवाय व्यायाम करू शकत नाहीत. मात्र या काळात स्वतःला नवीन सवय लावून घेण्याची सर्व खेळाडूंना संधी आहे. त्याशिवाय प्रत्येक खेळाडूंनी आर्थिक परिस्थिती भिन्न असली, तरी त्यांच्याकडे स्मार्टफोन नक्कीच असतो, त्यामुळे समाज माध्यमावर अधिक वेळ घालविण्यापेक्षा घरात करता येणाऱ्या व्यायामाच्या चित्रफिती पाहून खेळाडू स्वतःचे शारीरिक संतुलन सांभाळू शकतात. उन्हाळ्याच्या सुट्टी दरम्यान अनेक मुले विविध क्रीडा शिबिरात सहभागी होतात, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे न कुठे समर कॅम्प आयोजित करण्यात येतात. 

नक्की वाचा :  दिलासादायक : त्या महिलेच्या संपर्कातील सात जणांचे अहवाल निगेटीव्ह 

क्रीडा शिबिर हे सर्व खेळाडूंच्या भक्कम पायाभरणी साठी उपयुक्त असते. परंतु यंदा ते शक्‍य नसल्याने पालकांनी मुलांच्या शारीरिक हालचालींकडे लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. जे विद्यार्थी सोसायटीमध्ये राहतात त्यांना दिवसातून किमान एक तासासाठी सोसायटीच्या प्रांगणात अथवा जवळच्या क्रीडांगणात व्यायाम करता येऊ शकतो. परंतु यादरम्यान सामाजिक अंतराचे भान बाळगणेही आवश्‍यक आहे. त्यामुळे दोन-तीन मुलांच्या प्रत्येकी एक गट पाडून, असे उपक्रम पालकांच्या निदर्शनाखाली करता येऊ शकतात. किंवा घरच्या घरी पालक आपल्या मुलांची शारीरिक जडणघडण नक्कीच करू शकतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Lockdown allows players to self-test by sport ticher narendra bhoi