जिल्ह्यात "लॉकडाउन'मध्ये 5 हजार मजुरांना कामे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

देशभरात "कोरोना'चा संसर्ग टाळण्यासाठी "लॉकडाउन' लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा. जिल्ह्यातील नागरिकांची उपासमार होऊ नये, त्यांच्या हाताला काम मिळावे,

जळगाव : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन'च्या काळात जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत 905 कामे सुरू आहेत. त्यावर 5 हजार मजूर काम करीत आहेत. सेक्‍युलर प्रणालीवर 2450 कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी दिली. 

देशभरात "कोरोना'चा संसर्ग टाळण्यासाठी "लॉकडाउन' लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा. जिल्ह्यातील नागरिकांची उपासमार होऊ नये, त्यांच्या हाताला काम मिळावे, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जास्तीत जास्त कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरू झालेल्या कामांमध्ये बहुतांश कामे वैयक्तिक घरकुल बांधणे, शौचालय तयार करणे, फळबाग तयार करणे, शोषखड्डे, विहीर खोदणे, गाळ काढणे यांचा समावेश आहे. 

डेटॉल साबण वितरण 
"कोरोना'चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मजुरांनी "मास्क'चा वापर करावा. सामाजिक अंतर ठेवण्याची खबरदारी घ्यावी. रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांना वारंवार हात धुण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून डेटॉल साबणाचे वितरण करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मते यांनी दिली. 

तालुकानिहाय सुरू असलेली कामे 

तालुका--मजूर--कामे 
अमळनेर--126--11 
भडगाव--223--39 
भुसावळ--280--63 
बोदवड--584--122 
चाळीसगाव--493--87 
चोपडा--387--100 
धरणगाव--173--35 
एरंडोल--670--40 
जळगाव--59--14 
जामनेर--517--72 
मुक्ताईनगर--278--63 
पाचोरा--395--36 
पारोळा--135--22 
रावेर--368--121 
यावल--299--70 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lockdown rojgar hami yojna work for five thousand worker