Loksabha 2019 : "जळगाव', "रावेर'मधून नऊ जणांची माघार;  दोन जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

जळगाव ः लोकसभा निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी दोन्ही मतदारसंघातील एकूण नऊ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे दोन्ही जागांसाठी आता एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांना आज दुपारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता उमेदवारांच्या प्रचारास खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. 
जळगाव मतदारसंघात एकूण 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज माघारीच्या दिवशी पाच उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता जळगावच्या जागेसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. 

रावेर मतदारसंघात एकूण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज माघारीच्या दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता रावेरच्या जागेसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 

यांनी घेतली माघार 
जळगाव मतदारसंघातून वंदना प्रभाकर पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, गनीशाह इस्हाक शाह, प्रदीप भीमराव मोतीराया, रऊफ युसूफ शेख. तर रावेर मतदारसंघातून रवींद्र दंगल पवार, सुनील पंडित पाटील, इम्रान रऊफ खान, सुनील संपत जोशी यांनी माघार घेतली आहे. 
 
रिंगणातील उमेदवार असे ः 
जळगाव मतदारसंघ (कंसात पक्ष व निशाणी) 
आमदार उन्मेष भय्यासाहेब पाटील (भाजप-कमळ), गुलाबराव बाबूराव देवकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस - घड्याळ), राहुल नारायण बनसोडे (बहुजन समाज पार्टी- हत्ती), अंजली रत्नाकर बाविस्कर (वंचित बहुजन आघाडी - कपबशी), ईश्वर दयाराम मोरे (बहुजन मुक्ती पार्टी - खाट), मोहन शंकर बिऱ्हाडे (राष्ट्रीय समाजवादी पक्ष (सेक्‍युलर)- बॅटरी टॉर्च), शरद गोरख भामरे- सुतार (राष्ट्रीय जनशक्ती पार्टी (सेक्‍युलर)- नारळाची बाग), संतश्री बाबा महाहंसजी महाराज पाटील (हिंदुस्थान निर्माण दल- पाण्याची टाकी), अनंत प्रभाकर महाजन (अपक्ष- फुलकोबी), ओंकार आबा चेनसिंग जाधव (अपक्ष- शिट्टी), मुकेश राजेश कुरील (अपक्ष- संगणक), ललित (बंटी) गौरीशंकर शर्मा (अपक्ष- ऊस शेतकरी), सुभाष शिवलाल खैरनार (अपक्ष - चावी), संचेती रूपेश पारसमल (अपक्ष- कपाट). 
 
रावेर मतदारसंघ 
डॉ. उल्हास वासुदेव पाटील (कॉंग्रेस - हात), रक्षा निखिल खडसे (भाजप - कमळ),  डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते (बहुजन समाज पार्टी- हत्ती), अजित नामदार तडवी (राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी- दूरध्वनी), अडकमोल रोहिदास रमेश (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया- कोट),  नितीन प्रल्हाद कांडेलकर (वंचित बहुजन आघाडी- कपबशी), मधुकर सोपान पाटील (हिंदुस्थान जनता पार्टी- दूरदर्शन), रोशन आरा सादिक अली (इंडियन युनियन मुस्लिम लीग- गॅस सिलिंडर),  गौरव दामोदर सुरवाडे (अपक्ष- खाट), तंवर विजय जगन (अपक्ष- बॅट), नजमीन शेख रमजान (अपक्ष- झगा), डी. डी. वाणी (फोटोग्राफर) (अपक्ष - कॅमेरा). 
 
Web Title: marathi news jalgaon loksabha election 26 candidate