Loksabha 2019 : जळगाव, रावेर लोकसभेची अधिसूचना 28 मार्चला : जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

Loksabha 2019 : जळगाव, रावेर लोकसभेची अधिसूचना 28 मार्चला : जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

जळगाव ः जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेची अधिसूचना 28 मार्चला प्रसिद्ध होईल. नंतर लागलीच अर्ज दाखल करणे सुरू होईल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिलला आहे. 23 एप्रिल मतदान होईल, अशी माहिती जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभेचे निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलावळे उपस्थित होते. 
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 1 हजार 960 मतदान केंद्र असून, 53 सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहेत. या मतदार संघात 19 लाख 09 हजार 735 इतके मतदार आहेत. यामध्ये 10 लाख 1 हजार 249 पुरुष तर 9 लाख 8 हजार 427 महिला तर 59 इतर मतदारांचा समावेश आहे. 
रावेर लोकसभा मतदार संघासाठी 1 हजार 872 मतदान केंद्र असून, 87 सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहे. या मतदारसंघात 17 लाख 60 हजार 175 इतके मतदार आहेत. यामध्ये 9 लाख 17 हजार 488 पुरुष तर 8 लाख 42 हजार 661 महिला तर 26 इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 7 हजार 393 पुरुष तर 59 महिला असे एकूण 7 हजार 452 सैनिक मतदार आहेत. 

नियंत्रण पथके अन "ऍप' 
आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी, खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. C-vigil ऍपचाही वापर करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर आचारसंहिता अंमलबजावणी, मतदान यंत्रे, मतदार जागृती, प्रशिक्षण, मनुष्यबळ व्यवस्थापन, खर्च व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, दिव्यांग मतदार व्यवस्थापन आदींसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
दृष्टिक्षेपात... 
बॅलेट युनिट-- 8 हजार 17 
कंट्रोल युनिट-54 हजार 583 
व्हीव्हीपॅट मशिन-- 4 हजार 927 
कर्मचारी-- 32 हजार 529 
क्रिटिकल मतदान केंद्र--28 
संवेदनशील मतदान केंद्र--40 
 
* अधिसूचना प्रसिद्धी - 28 मार्च 
* अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख- 4 एप्रिल 
* अर्जांची छाननी - 5 एप्रिल 
* माघारी- 8 एप्रिल 
* मतदान - 23 एप्रिल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com