जळगाव लोकसभा उमेदवारीबाबत "नो कॉमेंट्‌स': ऍड. उज्ज्वल निकम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण त्याबाबत सद्या तर काहीही बोलणार अशी प्रतिक्रिया राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

राज्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुंबई येथे बैठक घेण्यात आली. यावेळी जळगाव लोकसभेसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांना सहमती दर्शविण्यात आली. मात्र ऍड.निकम यांच्या सहमतीनंतरच त्यांची उमेदवारी निश्‍चित करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी पक्षातर्फे राज्याचे माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी यांना ऍड. निकम यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा करण्याचे अधिकारही देण्यात आले. 
याबाबत ऍड. निकम यांच्याशी "सकाळ'ने संपर्क साधला असता. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमेदवारीबाबत आपल्याला प्रसिद्धी माध्यमातूनच कळले. मी सद्या नगरमध्ये असल्याने त्याबाबत आपल्याला काहीही माहीत नाही, त्याबाबत "नो कॉमेंट्‌स' असे मतही त्यांनी व्यक्त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon loksabha election nikam