जळगाव मतदारसंघासाठी 15 कोटी मंजूर : खासदार ए. टी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

भडगाव : लोकसभेच्या जळगाव मतदारसंघासाठी खासदार ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत 164 कामांसाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना मिळणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामांना गती मिळणार असल्याचे चित्र आहे. 

भडगाव : लोकसभेच्या जळगाव मतदारसंघासाठी खासदार ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत 164 कामांसाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना मिळणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामांना गती मिळणार असल्याचे चित्र आहे. 
राज्याच्या ग्रामीण विकास विभागामार्फत मूलभूत सुविधा योजनेंतर्गत खासदार ए. टी. पाटील यांनी ग्रामीण भागासाठी राज्य शासनाकडून पंधरा कोटी रुपये निधी खेचून आणला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून हा निधी आणण्यात यश आल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. या निधीतून सभागृह, कॉंक्रिटीकरण, शौचालय, स्मशानभूमी व इतर कामे होणार आहेत. 
निधी मंजूर झालेली गावे ः पारोळा तालुका- तामसवाडी, कन्हेरे, तरडी, चिंचखेडे, सावखेडा होळ, जिराडी, मोंढाळे, रामनगर, वसंतवाडी, दगडी सबगव्हाण, एरंडोल तालुका- पिंप्री बुद्रूक, खर्ची खुर्द, विखरण, उमर्दे, कासोदा, हनुमंतखेडे, सोनबर्डी, धारागीर, जळू व पातरखेडे. चाळीसगाव तालुका- जामडी, माळशेवगे, चांभार्डी, शेवरी तांडा, चितेगाव, पिंप्री बुद्रुक प्र. चा., मेहुणबारे, टाकळी प्र. चा., करजगाव तांडा, वडाळे, दहिवद. जळगाव तालुका- रिगूर, डिगसाई, तरसोद, भोलाणे, देऊळवाडे, पाथरी, घार्डी, असोदा, कानसवाडे, धानोरे. भडगाव तालुका- वडगाव बुद्रूक, कोठली, देव्हारी, बाळद खुर्द, निंभोरा, भातखंडे, अंजनविहिरे, कजगाव, गिरड. धरणगाव तालुका- सोनवद, अंजनविहिरे, बाभोंरी, बोरगाव खुर्द, भोणे, वंजारी, विवरे, कल्याण खुर्द, अनोरे. अमळनेर तालुका- जानवे, मारपूर, गलवाडे, जवखेडे, कळमसरे, तांदळी, निमझरी, सावखेडा, जळोद, शिरसाळे, बहादरपूर, अमळगाव, निम, पिंपळी, पाडळसरे, आर्डी आनोरे, पाडसे, खवशी, रत्नपिंप्री, देवगाव देवळी, शिरसोदे, मांडळ, रणाईचे, सावखेडा, भरवस, कळमसरे, मुंडी प्र. डा., वसंतनगर, मारवड, पिळोदा, पातोंडा, शहापूर, नगाव खुर्द, धार, जवखेडा, ढेकूसीम, वावडे, गांधली, गलवाडे, सारबेटे, डांगरी, निंभोरा, कोळपिंप्री, जानवे, गडखांब, टाकरखेडा, दळवेल, शिरूड, दहिवद, झाडी, भिलाली, ढेकू खुर्द, मंगरूळ, शेवगे बुद्रूक, जैतपीर, नगाव बुद्रुक, आंबापिंप्री, पाचोरा तालुका- तारखेडा खुर्द, लोहारी, खडकदेवळा खुर्द, गाळण खुर्द, लासगाव, खडकदेवळा, दहिगाव संत, परधाडे, दुसखेडा, नांद्रा, परधाडे, कुरंगी, पिंप्री, पुनगाव, अंतुर्ली खुर्द, ओझर, बाळद, बांबरूड खुर्द, टाकळी बुद्रूक, लोहटार, तारखेडा खुर्द, पिंपळगाव हरेश्‍वर, वाडी, वडगावकडे, सावखेडा खुर्द, सातगाव डोंगरी, माहेजी, चुंचाळे, संगमेश्‍वर, नगरदेवळा, नेरी, खाजोळा, भातखंडे, सारोळा बुद्रुक, चिंचखेडे, आर्वे, आंबेवडगाव, तारखेडा बुद्रुक, काकेडीतांडा, वरखेडी, जारगाव, अंतुर्ली प्र .लो. 
 
खासदारांचा निवडणुकीपूर्वी धमाका 
खासदार ए. टी. पाटील यांनी यांनी निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी मतदारसंघात एवढ्या प्रमाणावर निधी आणून एकप्रकारे धमाका केला आहे. खासदारांना दरवर्षी पाच कोटी रुपये निधी मिळतो. मात्र, लोकसभा मतदारसंघातील गावांची संख्या, जळगाव शहर, पालिका क्षेत्र पाहता हा निधी तोकडा पडतो. त्यामुळे खासदार निधी वाटप करताना मर्यादा येतात. खासदार पाटील यांनी मात्र पंधरा कोटी रुपये निधी आणून ग्रामीण भागाला खूश केल्याचे दिसत आहे. 

खासदार निधीव्यतिरिक्त पाठपुरावा करून राज्य शासनाकडून ग्रामीण भागासाठी पंधरा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे सुरू होतील. ग्रामीण विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणू शकल्याचे समाधान आहे. 
- ए. टी. पाटील, खासदार, जळगाव लोकसभा मतदारसंघ 

Web Title: marathi news jalgaon loksabha mardar 15 carrore