"राष्ट्रवादी' सज्ज; भाजप उमेदवारीबाबत उत्कंठा! 

"राष्ट्रवादी' सज्ज; भाजप उमेदवारीबाबत उत्कंठा! 

देशातील लोकशाहीचा "कुंभ' म्हणून संबोधण्यात येत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची लढाई निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या वेळेपेक्षा तब्बल सव्वा लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. या नवीन मतदारांचा कल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात भाजप-सेनेची युती झाल्यानंतर जळगाव लोकसभा निवडणूक लढविण्याचा शिवसेनेचा दावा काहीसा कमी झालेला आहे. त्यामुळे युतीतील भाजप उमेदवार आणि आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार यांच्यात राहणार आहे. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेचा भाजप उमेदवार ए. टी. पाटील यांना फायदा झाला होता. यावेळी मात्र चित्र बदलण्याचे संकेत असून दळणवळण, शेती, सिंचन तसेच उद्योग यांच्या विकासाच्या मुद्दे मुख्य असणार आहेत. 
 
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर खरी लढाई आजपासून सुरू होणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात निवडणुकीसाठी पक्षांची राजकीय घुसळण अगोदरच सुरू झाली आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ए. टी. पाटील विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. सतीश पाटील यांच्यात लढत झाली होते. डॉ. पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती, त्याच आधारावर त्यांच्या यशाचे गणित मांडले जात होते. मात्र, जळगाव येथे नरेंद्र मोदी यांची सभा झाली अन संपूर्ण वातावरणच मोदीमय झाले अन निवडणुकीचा कलच भाजप-सेना युतीच्या बाजूकडे गेला अन भाजपचे ए. टी. पाटील यांनी मोठा विजय मिळविला. गेल्या मतदार संघातील विकासाचा हिशेब जनता करीत आहेत. याच आधारावर जनता आता विकास अधिक करणाऱ्या उमेदवाराचा शोध घेऊन मतदान करतील. 
 
"राष्ट्रवादी'ची तयारी, युतीचा उमेदवाराचा शोध 
जळगाव लोकसभा मतदार संघातील राजकीय घडामोडी दिवसागणिक बदलत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. भाजपने केलेल्या लोकसभा निवडणूक सर्व्हेक्षणात भाजपचे खासदार ए. टी. पाटील यांचे काम चांगले असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार, हे निश्‍चित मानले जात होते. त्यामुळे त्यांच्यासमोर विरोधकांचा उमेदवार कोण? याबाबतही चर्चा होती. त्यातच शिवसेनेनेही कंबर कसली होती. आर. ओ. पाटील यांनीही लढाईची तयारी सुरू केली होती. मात्र, युती झाल्यानंतर हा मतदार संघ भाजपच्या वाट्यावर असल्याने शिवसेनेने आपला दावा कमी केला. भाजपची फळी भक्कम समजली जात असतानाच एका व्हायरल क्‍लीपने चित्र बदलले आणि भाजप उमेदवाराचे नाव मागे पडले. त्याच वेळी आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्यामुळे त्यांच्याकडेही स्पर्धा होती. मात्र, पक्षाचे नेते शरद पवार यांनी गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची आता तयारीत आहे. परंतु दुसरीकडे भाजपचा उमेदवार कोण यांचीच उत्कंठा आहे. 
 
प्रकाश पाटील की स्मिता वाघ? 
भाजपतर्फे उमेदवारीसाठी चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील, पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ आणि पाटबंधारे बांधकाम सल्लागार प्रकाश पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. आमदार उन्मेश पाटील यांनी उमेदवारीबाबत फारशी उत्सुकता दाखविलेली नाही. आमदार स्मिता वाघ यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकारणाला सुरवात केली आहे. त्यामुळे त्यांचा दावा प्रबळ ठरत आहे. तर प्रकाश पाटील राजकीय क्षेत्रात नवखे असले तरी पाटंबाधारे विभागात बांधकाम सल्लागार असल्याने सिंचन क्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्या आधारावर ते विकास कामाचे सूत्र बांधू शकतात, असे म्हटले जात आहे. स्थानिक नेत्यांनीही उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असल्याचे सांगितले जात आहे. तर वरिष्ठ स्तरावरूनही त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याचे मानले जात आहे. मात्र, पक्षातर्फे उमेदवारीची अधिकृत घोषणा कोणाची होणार? याचीच आता खऱ्या अर्थाने उत्कंठा कार्यकर्ते आणि मतदारांतही आहे. 
 
निवडणुकीतील महत्त्वाचे प्रश्‍न 
- पाडळसे, शेळगाव बॅरेजसह अनेक महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प अपूर्ण 
- गिरणा बलून बंधाऱ्याचा प्रश्‍न 
- वाघूर धरणातून शेतीत पाणी पोहोचण्याची प्रतीक्षा 
- जळगाव-फागणे महामार्गाचे चौपदरीकरण 
- जळगावातील औद्यागिक हद्द वाढीचा प्रश्‍न 
 
2014 मध्ये उमेदवारांना मिळालेली मते 
- ए. टी. पाटील (भाजप) - 6,47,773 
- डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी)- 2,64,248 
- व्ही. डी. बागूल (बसपा) 10,838 
- डॉ. संग्राम पाटील (आप) 7390 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com