Loksabha 2019 : जळगाव लोकसभेतून उन्मेष पाटलांचा भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

जळगाव ः जळगाव लोकसभा मतदारसंघात आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपतर्फे आमदार उन्मेष पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जळगाव ः जळगाव लोकसभा मतदारसंघात आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपतर्फे आमदार उन्मेष पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आमदार स्मिता वाघ यांनी पूर्वी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी भाजपने वाघ यांची उमेदवारी रद्द करून आमदार पाटील यांना उमेदवारी दिली. आमदार पाटील यांचा अर्ज भरताना निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कक्षात त्या मात्र आल्या नाहीत. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, आमदार शिरीष चौधरी, आमदार गुरुमुख जगवानी आदी यावेळी उपस्थित होते.  आमदार पाटील यांनी दोन वेगवेगळे प्रकार अर्ज भरले आहेत. आमदार स्मिता वाघ यावेळी उपस्थित होत्या.  

Web Title: marathi news jalgaon loksabha MLA unmesh patil candidate bjp