गिरीश महाजनांना "पवार मॅनिया' : ऍड. रवींद्र पाटील

ravindra patil
ravindra patil

जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना "पवार मॅनिया' झाला आहे. त्यांना आता रात्री झोपही लागत नाही. त्यांनी बारामतीत जरूर जावे, त्यांचे स्वागतच आहे; परंतु त्यांनी प्रथम जळगाव जिल्ह्याचा विकास करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. 
आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, महिला आघाडीच्या महानगर जिल्हाध्यक्ष नीला चौधरी, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष ललित बागूल आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ऍड. पाटील म्हणाले, की महाजन हे केवळ पवार यांच्यावरच टीका करीत आहेत. त्यांना केवळ "मॅनिया' झाला आहे, पवार नावाशिवाय झोपही येत नाही. स्वत:ची फुशारकी मारण्यासाठी व स्वस्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी पवार यांचे नाव घेत आहेत. त्यांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर भाषणात सांगतात आपण पवारांचे बोट धरून राजकारणात आलो; परंतु महाजन मात्र मनाला वाटेल ते बोलतात. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. त्यांनी बारामतीला जरूर जावे, तेथे त्यांचे स्वागतच आहे. परंतु जळगाव जिल्ह्याचा प्रथम विकास करावा. ते जलपसंपदामंत्री आहेत, मात्र सिंचनाचा एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यांनी अगोदरच ही कामे पूर्ण करावीत. 
 
बुधवारी "जबाब दो' आंदोलन 
राष्ट्रवादी कॉंग्रेस व शहर युवक कॉंग्रेसतर्फे बुधवारी (ता. 13) "जबाब दो निषेध मोर्चा' आयोजित करण्यात आला आहे. दुपारी एकला आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येईल. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, अरुणभाई गुजराथी, ईश्‍वरलाल जैन, गुलाबराव देवकर आदी उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण ललित बागूल यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com