आमदारांकडून 25 कोटींच्या कामांचे श्रेय लाटण्याचा घाट : मनपा विरोधी पक्षनेते महाजन

आमदारांकडून 25 कोटींच्या कामांचे श्रेय लाटण्याचा घाट : मनपा विरोधी पक्षनेते महाजन

ळगाव ः शहराच्या विकासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 25 कोटींच्या कामाचे नियोजन हे खानदेश विकास आघाडी सत्तेत असताना झाले. याबाबत 24 ऑगस्टला वर्कऑडर मक्तेदाराला दिली. आमदार 
सुरेश भोळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तोंडी सूचना देऊन ही कामे थांबवून कामांचा प्रारंभ त्यांची सत्ता स्थापन झाल्यावर करून या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला. 
25 कोटींच्या कामांबाबत आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, नीलेश पाटील आदी उपस्थित होते. सुनील महाजन म्हणाले, की नागरिकांना मूलभूत गरजांची आवश्‍यकता असताना आमदारांनी हे कामे थांबविण्यामागे काय कारण आहे. या कामांच्या उद्‌घाटनप्रसंगी तत्कालीन नगरसेवकांना बोलविले जावे. शहराच्या विकासासाठी शंभर 
कोटींचा निधी आमदारांनी आणला, त्याचे श्रेय त्यांनी घ्यावे. "खाविआ'ने मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा घाट त्यांनी करून नये, असा सल्लाही महाजन यांनी दिला. 

विकासकामात राजकारण नको 
आमदार भोळे हे इव्हेंट करून आमचा महापौर होताच शहरात विकासकामांना सुरवात झाली, असे दाखवीत आहेत. त्यांनी विकासकामात राजकारण करू नये. ज्या नगरसेवकांनी कामांसाठी पाठपुरावा केला, त्यांना सोबत घ्यावे. 

जनतेची दिशाभूल करू नका 
महानगरोत्थान योजनेंतर्गत शहरासाठी 100 कोटींचा निधी मिळणार आहे. हा निधी मिळविण्यासाठी महापालिकेला त्यांचा 30 कोटीचा हिस्सा द्यावा लागेल. या निधीतून केवळ नाले, स्मशानभूमी ही कामे करणे बंधनकारक असते. या निधीतून गटार, रस्त्यांची कामे कशी काय करताहेत. त्यामुळे ही जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप महाजन यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com