महापालिकेत शिवशक्तीचाच विजय होईल! : आदेश बांदेकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकीवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. त्यामुळे धनशक्तीचा व शिवशक्तीच्या लढाईत विजय शिवशक्तीचाच होईल, असा विश्‍वास शिवसेनेचे सचिव तथा अभिनेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केला. 
प्रभाग आठमधील उमेदवारांची प्रचारसभा आज यश लॉन येथे झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे सुरेशदादा जैन, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी आमदार आर. ओ. तात्या 
पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार किशोर पाटील, श्‍याम कोगटा, गजानन मालपुरे यांच्यासह मान्यवर, उमेदवार उपस्थित होते. सभेला मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महिला- पुरुष नागरिक उपस्थित होते. 

200 कोटी द्या, विकास करून दाखवू 
सभेत सुरेशदादा बोलताना म्हणाले, की मुख्यमंत्री हे सर्वांचे असतात, पण त्यामुळे जळगावला सावत्र वागणूक ते देणार नाही. सरकारकडून 200 कोटी रुपये जे मिळणार आहेत ते गिरीश महाजनांनी "मी जळगावकर' म्हणून आम्हाला द्यावे. दुष्काळात वाघूरचे मिळालेले पाणी, स्टेडियम, विमानतळ बांधले आम्ही बांधले. आपलं जळगावसाठी पुन्हा जळगावकरांनी आशीर्वाद द्यावा, असे यावेळी म्हणाले. 

प्रचार फेऱ्यांना उंदड प्रतिसाद 
प्रभाग 12 मध्ये आज आज सकाळी दहाला दुपारी प्रभाग क्रमांक 6,7,8 मध्ये उमेदवारांच्या प्रचार रॅलीत आदेश बांदेकरांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देताना शिवसेनेलाच मतदान करण्याचा आवाहन केले. 

भावजीला पाहण्यासाठी गर्दी 
बांदेकरांचे ज्या प्रभागामध्ये प्रचारासाठी तिथे महिला व तरुण, तरूणींकडून स्वागत करण्यात आले. तसेच पावसात ही यश लॉनवरील बांदेकर यांना पाहण्यासाठी भेटण्यासाठी महिलांची गर्दी मोठी होती.

Web Title: marathi news jalgaon mahapalika election shivshakti aadesh bandekar