मानवी साखळीद्वारे गाळे लिलावाचा नोंदविला निषेध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

जळगाव ः महापालिकेच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारक दोन दिवसापासून प्रशासनाच्या प्रस्तावित गाळे लिलाव, अवाजवी बिलाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहे. तिसऱ्या दिवशी गाळेधारकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयापासून मानवी साखळी करून टॉवर ते महापालिकेपर्यंत साखळी तयार करून विविध घोषणा देवून निषेध नोंदविला. 

महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारक संघटनेकडून गाळे लिलाव, अवाजवी बिलांबाबत प्रशासनाच्या विरोधात बेमुदत व्यापार बंद, धरणे आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा, बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून गाळेधारकांनी मुडंन करू निषेध नोंदविला. त्यात आज मार्केट संघटनेनी गाळेधारक, कुटूंबीय, दुकानातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. तर तात्काळ योग्य तो निर्णय न घेतल्यास यापुढे आंदोलन कमी नव्हता तिव्र करण्यात येईल असा इशारा मनपा गाळेधारक मार्केट कोअर कमेटीतर्फे केला आहे. 

दोन तास वाहतुक विस्कळीत 
गाळेधारकांनी मानवी साखळी करून रस्त्यांच्या एका बाजूला गाळेधारक जात होते. ही मानवी साखळी जिल्हाधिकारी कार्यालयापासून स्वातंत्र्य चौक, नवीन बस स्थानक, स्टेडीयम चौक, खानदेश कॉम्प्लेक्‍स चौक, नेहरू पुतळा चौक, टावर चौक त्यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारा पर्यंत साखळी तयार करण्यात आली.

Web Title: marathi news jalgaon mahapalika nishedh