महासभेतील ठरावानुसार समिती गठित होणारच! : आमदार भोळे

महासभेतील ठरावानुसार समिती गठित होणारच! : आमदार भोळे

जळगाव ः लोकशाहीत निर्णय घेताना अडचणी येतच असतात. महासभेत गाळेधारकांबाबत 40 क्रमांकाच्या ठरावाबाबत समिती गठित करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. विरोधकांचा जरी या समितीला विरोध असला तरी आम्ही ठरावानुसार समिती गठित करू, असे आमदार सुरेश भोळे यांनी स्पष्ट केले. 
महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 375 गाळेधारकांबाबत 40 क्रमांकाचा ठरावावर नुकताच झालेल्या महासभेत समिती स्थापन करण्याचा ठराव केला होता. परंतु या ठरावाने अडचणी वाढण्याची शक्‍यता असल्याने भाजपच्या काही नगरसेवकांनी समिती गठित करण्याचा ठरावच रद्द करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. याबाबत आज आमदार यांना ठरावाबाबत चर्चा केली असता त्यांनी महासभेत ठराव झाला असून, त्री सदस्यीय समिती गठित केली जाईल. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. 

समितीमार्फत पूर्ण मूल्यांकन 
गाळेधारकांना लावलेला पाचपट दंड हा अवाजवी असल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणत्या पद्धतीने हा दंड लावला, बाजार मूल्यांकन कसे काढले गेले, याबाबत नियुक्त केलेल्या समितीमार्फत तपासणी केली जाईल. 

समितीमध्ये विधिज्ञांचा समावेश 
महासभेत केलेल्या ठरावानुसार त्री सदस्यीय समिती येत्या तीन-चार दिवसात गठित केली जाईल. यात आयुक्त, सहाय्यक नगररचनाकार संचालक व भाजपचे काही सदस्य व विधीतज्ञाचा समावेश असेल. जेणे करून कायदेशीर बाबी तपासून अहवाल हा महासभेपुढे मांडला जाणार आहे, असे आमदार भोळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com