विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झालेल्यांची नोंदच नाही 

विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झालेल्यांची नोंदच नाही 

जळगाव ः यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून अर्थात गेल्या तीन-चार महिन्यांत विजेचा धक्का लागून दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला. यात "महावितरण'च्या चुकीमुळे काही घटना घडल्या; तर काही घटना या घरातील समस्यांमुळे झाल्या. मात्र, असे असले तरी "महावितरण'कडे गेल्या वर्षभरात किती जणांचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला, यासंदर्भात नोंदच नसल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, "महावितरण' केवळ आकड्यांची हेराफेरी करीत असल्याने संबंधितांना दिल्या गेल्या मदतीबाबतही शंका व्यक्त होत आहे. 
घरापर्यंत वीजपुरवठा करणाऱ्या "महावितरण'चा अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठी भूमिका असते. अर्थात विजेचा धक्का लागण्याच्या घटना पावसाळ्यात अधिक प्रमाणात घडत असून, इतक्‍या घटना घडत असताना "महावितरण'कडून यात सुधारणा केली जात नाही. सुधारणा करण्याकडे दुर्लक्ष असले; तरी विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्यांना मोबदला दिला जातो. हा मोबदला किती जणांना दिला, याचीही आकडेवारी "महावितरण'च्या जळगाव परिमंडळाकडे उपलब्ध नाही. मागील तीन-चार महिन्यांपासून घटनांमध्ये वाढ झाली असताना "महावितरण'चे मात्र याकडे दुर्लक्षच आहे. 

आकडेवारींची हेराफेरी 
मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये साधारण बारा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये काही घटना "महावितरण'च्या चुकीमुळे झाल्या आहेत. लोंबकळणाऱ्या वीजतारा, वाऱ्याने तुटलेल्या तारांना स्पर्श होऊन मानवासह जनावरांनाही प्राण गमवावे लागले. अर्थात वीजमीटरपर्यंत येणाऱ्या पुरवठ्यापर्यंत "महावितरण' जबाबदार धरले जाते. परंतु याची खऱ्या आकडेवारीची नोंदही "महावितरण'कडे आपल्याकडे ठेवलेली नाही. "महावितरण'च्या चुकीमुळे मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जाते. मृत आणि केलेल्या मदतीच्या आकडेवारीतच हेराफेरी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अडीच महिन्यांपासून टाळाटाळ 
विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्यांची माहिती "महावितरण'कडे मागितली असता ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आकडेवारी असून, घरगुती आणि महावितरण जबाबदार असलेल्या घटनांचे आकडे नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. अर्थात "महावितरण'च्या अधिकाऱ्यांकडेही याची स्पष्ट माहिती नसल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून आकडेवारी देण्यासंदर्भात टाळाटाळ केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com