"महावितरण'च्या अभियंत्याला 15 हजारांची लाच घेताना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

जळगाव : ग्राहकाच्या वीज मीटरचे सील तुटल्याने होणारी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मेहरुण येथील "महावितरण'च्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 

जळगाव : ग्राहकाच्या वीज मीटरचे सील तुटल्याने होणारी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मेहरुण येथील "महावितरण'च्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 
शहरातील रहिवासी असलेल्या तक्रारदाराचे वीज मीटरचे सील तुटलेले असल्याने "महावितरण'चे सहाय्यक अभियंता संदीप रणछोड बडगुजर (रा. रजनी अपार्टमेंट, पार्वतीनगर) यांनी मीटरचा पंचनामा केला. पंचनाम्यात वर्ष-2005 पासून आजपर्यंतची वीज आकारणी व त्यावरील दंड, असा सुमारे 40 ते 50 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, दंड न भरल्यास वीजपुरवठा खंडित होऊन गुन्हा दाखल होईल, अशी भीती दाखवून कारवाई टाळायची असेल, तर त्या बदल्यात सहाय्यक अभियंता संदीप बडगुजर यांनी तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. घडल्या प्रकाराने धास्तावलेल्या तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंता संदीप बडगुजर यांना उपअधीक्षक जी. एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अटक केली.

Web Title: marathi news jalgaon mahavitaran engeenier