गणपतीची नव्हे "डिपी'ची केली आरती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

जळगाव ः शहरातील वाल्मिकनगर परिसरात गेल्या चार- पाच महिन्यांपासून "महावितरण'ने डिपी बसविलेली नाही. वारंवार मागणी करून देखील महावितरण लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरीकांनी आज सकाळी परिसरातील डिपीला हार घालून आरती करत अनोखे आंदोलन केले. 

गणेशोत्सव सुरू असून, शहरातील वाल्मिकनगर परिसरात "महावितरण'ने ट्रान्सफॉर्मर न बसविल्याने परिसरात अंधार पसलेला असतो. या भागातील नागरीकांनी दीड महिन्यापुर्वीच आसोदा रोडवर रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी "महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर लवकर बसवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतू अद्यापपर्यंत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले नसल्याने नागरीकांनी आज डिपीची आरती करण्याचा मुहूर्त साधला. शहरात गणेशोत्सवाची धुम सुरू असताना वाल्मिकनगर परिसरात मात्र ट्रान्सफॉर्मर अभावी अनेक परिवार अंधारात आहेत. एकिकडे गणेश मंडळांकडून आरती सुरू असताना दुसरीकडे नागरीकांनी चक्‍क डिपीला हार चढवून पुजा विधी करत आरती केली. यावेळी महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mahavitaran transfarmer aarti