मराठा आरक्षणाचा प्रश्‍न ः जळगावात मार्केट पाडले बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

जळगाव ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून, औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. याचे पडसात जळगाव जिल्ह्यात देखील उमटू लागले असून, दुपारी मराठा समाजाच्यावतीने शहरातील मार्केट बंद करण्याची हाक दिली. 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजात सरकार विरोधात संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर समाजाच्या या आंदोलनाला हिंसक वळण आले असून, जिल्ह्यात देखील याचे पळसाद उमटू लागले आहेत. जिल्ह्यातील भडगाव, चाळीसगाव या शहरात सकाळपासून बंद पाळण्यात आला होता. मात्र जळगाव शहरात दुपारपर्यंत कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा बंद नव्हता. सकाळी मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मात्र अडीचच्या सुमारास समाजाच्यावतीने मार्केट परिसरात येवून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याबाबत आवाहन करण्यात आले. यात गोलाणी मार्केट, फुले मार्केट परिसरात काही वेळ दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यावेळी पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला होता. यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. 

Web Title: marathi news jalgaon maratha aarkshan market band