मराठा आरक्षणाला विरोध नाही, मुस्लिमांनाही ते द्या - खासदार ओवैसी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

जळगाव ः महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला असून, या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, सरकारने मुस्लिमांनाही आरक्षण द्यायला हवे. सरकारी नोकरीत मुस्लिमांची संख्या केवळ चार टक्के आहे. तरुणांमध्ये परिवर्तनाची क्षमता असल्यामुळे देशात, राज्यात नक्कीच पुढे परिवर्तन होईल, असे मत "एमआयएम'चे खासदार असुद्देन ओवैसी यांनी व्यक्त केले. 

जळगाव ः महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला असून, या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, सरकारने मुस्लिमांनाही आरक्षण द्यायला हवे. सरकारी नोकरीत मुस्लिमांची संख्या केवळ चार टक्के आहे. तरुणांमध्ये परिवर्तनाची क्षमता असल्यामुळे देशात, राज्यात नक्कीच पुढे परिवर्तन होईल, असे मत "एमआयएम'चे खासदार असुद्देन ओवैसी यांनी व्यक्त केले. 
महापालिका निवडणुकींतर्गत प्रभाग क्र. 18 मध्ये "एमआयएम'च्या उमेदवारांसाठी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर वाहिद पठाण, बशीरभाई, रेहान जहॉंगीर, जिया बागवान उपस्थित होते. ओवैसी म्हणाले, की या देशात मुस्लिम व दलितांना मोदी सरकार किंमत देत नसून अनेक बंधने समाजावर लादत आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या कमी असूनही त्यांना सुविधा फडणवीस सरकार देत नाही. 77 वर्षांपासून कॉंग्रेस देशात राज्य करत होती आणि त्याचे गुलाम मुस्लिम होते. परंतु मुस्लिमांना कॉंग्रेसनेही काहीच दिले नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष एकाच माळेचे मणी असून, आजच्या युवकाला हे परिवर्तन घडविण्याची संधी आहे. 

सभेस प्रचंड गर्दी 
ओवैसींच्या सभेस एरंडोल, पारोळा, धरणगाव आदी ठिकाणांवरून तसेच शहरातील विविध मुस्लिम भागांतून 
मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची गर्दी होती. त्यामुळे मेहरुणमधील ममता हॉस्पिटलसमोरील रस्ता पूर्णपणे गर्दीने फुल्ल होता. तसेच उभे राहण्यासाठी जागा नसल्याने अनेकांनी घरांवर, बाजूच्या बाजाराच्या संकुलांच्या छतावर जाऊन ओवैसींचे भाषण ऐकले. 

पोलिसांची दमछाक 
सभेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तातडीने मागवावा लागला. तसेच ओवैसी यांचे आगमन झाल्यानंतर व्यासपीठामागील बाजूस गोंधळ व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करून गर्दी नियंत्रणात आणली. 

मोदी, राहुल गांधी गळाभेट दिखावूपणा 
राहुल गांधी व मोदी यांची गळाभेट ही दिखावूपणा आहे. गळ्यात गळा घालून कुठे देशाचे प्रश्‍न सुटणार आहेत का? त्यासाठी काम करण्याचे ध्येय पाहिजे. परंतु हे दोन्ही पक्ष देशातील नागरिकांना मूर्ख बनवत आहेत. त्यामुळे नागरिकांनो, हुशार व्हा, असे आवाहनही ओवैसी यांनी केले. 

Web Title: marathi news jalgaon maratha aarkshan musliem ovesi