मराठा क्रांती मोर्चातर्फे जळगावात रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

जळगाव : "मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे'अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जळगावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे तब्बल दीड तास मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती.

जळगाव : "मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे'अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जळगावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे तब्बल दीड तास मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती.
मराठा क्रांती मोर्चातर्फे दुपारी बारा वाजता जळगावातील आकाशवारी चौकात आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. मोर्चाचे नेते प्रतिभा शिंदे, भिमराव मराठे, गोपाल दर्जी, कल्पना पाटील,सचिन सोमवंशी, यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला."एक मराठा, लाख मराठा,मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता.माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही आंदोलनात काही वेळ सहभाग घेतला होता. यावेळी जळगावकहून मुंबईकडे व नागपूरकडे जाणारी वाहतूक तब्बल दीड तास रोखली होती. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.

Web Title: marathi news jalgaon maratha morcha rasta roko