मराठा समाजातर्फे भडगावात बंदसाठी रॅली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

भडगाव : येथे मराठा समाजाच्यावतीने सर्वपक्षीय कार्यकर्त्यानी आज सकाळी शहरात बंदचे आवाहन करण्यासाठी रॅली काढली. काही मिनिट पारोळा चौफुलीवर रास्ता रोको आदोलंनही केले. बंदच्या आवाहनाला संमिश्र पाठींबा मिळाला. 

भडगाव : येथे मराठा समाजाच्यावतीने सर्वपक्षीय कार्यकर्त्यानी आज सकाळी शहरात बंदचे आवाहन करण्यासाठी रॅली काढली. काही मिनिट पारोळा चौफुलीवर रास्ता रोको आदोलंनही केले. बंदच्या आवाहनाला संमिश्र पाठींबा मिळाला. 

मराठी क्रांती मोर्चाच्या आदोलंनाचे ढग भडगाव शहरात ही आज पहायला मिळाले. सकाळी अकरा वाजता पाचोरा रस्त्यावरून सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यानी बंदच्या आवहन करत रॅली काढली. ही रॅली बसस्थानक परीसर, चाळीसगाव रोड, बाळद रोड, मेन रोडमार्गे काढण्यात आली. दरम्यान पारोळा चौफुलीवर काही मिनेटे रास्तारोको ही करण्यात आला. "एक मराठा लाख मराठा' या घोषणांनी परीसर दणाणुन गेला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष शामकांत भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक पाटील, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, 'मनसे'चे उपजिल्हाध्यक्ष अनिल वाघ, निंभोर्याचे सरपंच दिलीप पाटील, बळीराम पाटील, नगरसेवक सुभाष पाटील, लोणपिराचेचे प्रदिप देसले, अतुल पाटील, वाकचे कुणाल पाटील, राष्ट्रवादीचे माजी शहरध्यक्ष रमेश शिरसाठ, कोठलीचे शिवदास पाटील, शरद पाटील, भुषण पवार, अनिल टेकडे, कल्याणराव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉग्रेस. योगेश पाटील, लक्ष्मण पाटील आदि पोलिस कर्मचार्यानी बंदोबस्त बजावला.

Web Title: marathi news jalgaon maratha samaj bhadgaon rally