मविप्र'संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा ताबा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा अधिकृत ताबा असल्याचा आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी दिला. आज पाटील गटाने संस्थेच्या नूतन मराठा विद्यालयाच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्तात प्रवेश कामकाजास प्रारंभ केला. 

जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा अधिकृत ताबा असल्याचा आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी दिला. आज पाटील गटाने संस्थेच्या नूतन मराठा विद्यालयाच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्तात प्रवेश कामकाजास प्रारंभ केला. 
जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा ताबा होता त्यांच्यातर्फे कामकाज सुरू होते. मात्र निलेश भोईटे यांनी आपले कार्यकारी संचालक मंडळ वैध असल्याचा ताबा करून कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. यावर पाटील व भोईटे गटात जोरदार वाद निर्माण झाला होता. यामुळे जिल्हा पेठ पोलीस निरिक्षकांनी या प्रकरणी सुनावणी करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार तालुका दंडाधिकारी तथा तहसिलादार अमोल निकम यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. 22मे2018ला सुनावणी पूर्ण झाली. 
सुनावणीचा निकाल 12जूनला तहसिलदार अमोल निकम यांनी दिला आहे. यात त्यांनी म्हटले आहे, कि नरेंद्र भास्कर पाटील गटाकडे कायदेशीर प्रक्रियेव्दारे म्हणजेच 11मे 2015 रोजी निवडून आलेल्या संचालक मंडळाचा ताबा असल्याचे स्पष्ट होत आहे. या उलट या सुनावणीतील पार्टी क्रमांक एक निलेश भोईटे यांचा कोणत्याही प्रकारे सदर संस्थेशी संबध येत नसल्याने निष्कारण ते वाद करीत आहेत, तसेच ते संस्थेचे नियुक्त व निवडून आलेले संचालकही नाहीत. 
तहसीलदार अमोल निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार नरेंद्र पाटील गटाने आज दुपारी संस्थेच्या महाविद्यालयात असलेल्या कार्यालयाचा पोलीस बंदोबस्तात ताबा घेवून कामकाजास प्रारंभ केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना संचालक हेमंतकुमार साळुंखे यांनी सांगितले, संस्थेचे कामकाज नरेंद्र पाटील गटातर्फे सुरूच होते,मात्र कार्यालयाता ताबा बेकायदेशीर मंडळीनी घेतला होता. परंतु तहसिलदार अमोल निकम यानीं दिलेल्या आदेशानुसार पाटील गटाचा संस्थेवर अधिकृत ताबा असल्याचे सिध्द झाले आहे.त्यामुळे आम्ही कार्यालयातून आजपासून कामकाज सुरू केले आहे. 
 
फौजदारी गुन्हे दाखल करणार 
यावेळी बोलतांना सांळुखे यांनी सांगितले, कि शासनाच्या चुकिचा पत्राचा आधार घेवून काही कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्य केली आहेत. त्या कर्मचाऱ्याविरूध्द येत्या चार दिवसात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. यावेळी चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक संजय पवार, ऍड.विजय भास्कर पाटील, डॉ.भालेराव साठे, महेश पाटील, डॉ.सतीश देवकर, हरिश्‍चंद्र पाटील,मनोहर पाटील, आनंदा कापडे, ऍड.भरत पाटील, दिपक सूयर्वंशी, प्रतिभा शिंदे, विनोद देशमुख, मुंकूंद सपकाळे आदी उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon maratha vidyaprasarak narendra patil