गाळे करार मुदतवाढीसह पाच ठराव विखंडित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जळगाव ः महापालिकेच्या मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 175 गाळ्यांची मुदत 2012 ला संपली होती. त्यानंतर गाळे कराराने देण्याबाबत महासभेत अनेक वेळा वेगवेगळे ठराव झाले. यात 2012 व 13 मध्ये करण्यात आलेले चारही ठराव अधिनियमातील तरतुदींची विसंगत असल्याने विखंडित, तर 99 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने गाळे देण्याबाबत करण्यात आलेला 1498 चा ठराव शासनाने 
निलंबित केला आहे. याबाबतचे आदेश 31 जुलैला महापालिका प्रशासनाला मिळाले आहेत. 

महापालिका मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत 2012 ला संपुष्टात आली होती. त्यानुसार गाळ्यांच्या मुदतवाढीसंदर्भात महासभेत विविध ठराव केले होते. महात्मा फुले व्यापारी संकुलासह अन्य 
सात व्यापारी संकुलातील गाळ्यांचा भाडेपट्टा मुदतवाढ देण्याबाबतचा ठराव 5 जानेवारी 2012 मध्ये करण्यात आला. त्यानंतर 1275 क्रमाकांचा मुदतवाढीचा ठराव 29 मार्चला करण्यात आला. महात्मा फुले मार्केटमधील दुकान गाळ्यांच्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण करण्याबाबत 1496 क्रमांकाचा ठराव आणि सेंट्रल फुले मार्केटमधील दुकान गाळ्यांच्या भाडेपट्ट्याचे नूतनकरण करण्याबाबत 1497 क्रमांकाचा 8 फेब्रुवारी 2013 मध्ये करण्यात आले. परंतु हे चारही ठराव महानगरपालिका अधिनियमातील कलम 79 (ड) मधील तरतुदींची विसंगत असल्याने शासनाने हे चारही ठराव शासनाने निलंबित केले. 

विखंडनाचे शासनाचे आदेश 
मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा भाडेपट्टा 99 वर्षांसाठी देण्याबाबतचा ठराव 18 फेब्रुवारी 2013 मध्ये करण्यात आला. परंतु गाळ्यांबाबत सर्व ठराव अधिक्रमित करून 19 मार्च 2012 ला महासभेने 40 क्रमांकाचा ठराव केला. हा ठराव करताना यापूर्वीचे सर्व ठराव अधिक्रमित करण्याचा ठराव महासभेने घेतल्याने ठराव क्रमांक 1231, 1275, 1496 आणि 1497 हे चारही ठराव शासनाने विखंडित केले आहे. तसेच 99 वर्षांच्या कराराचा ठराव देखील विखंडित करण्यात आला आहे. याबाबत शासनाचे आदेश महापालिका प्रशासनाला मिळाले आहे. 

ठरावास मुख्यमंत्र्यांची स्थगिती 
गाळ्यांबाबत 40 क्रमांकाचा ठराव करताना सर्व ठराव अधिक्रमित (रद्द) करून पाचपट दंड व जाहीर लिलावाचा ठराव महासभेने केला होता. या ठरावाला देखील मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर नगरविकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणी झाली होती. दरम्यान, या ठरावाबाबत दोन टक्के शास्ती आणि जाहीर लिलाव करण्याचे महापालिका प्रशासनला सूचित केले होते. 
 
Web Title: marathi news jalgaon market gade karar