परिचारीकांवर थातूर मातूर कारवाई 

परिचारीकांवर थातूर मातूर कारवाई 

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरुग्ण कक्षात हळदीकुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त लावणी व नाचगाण्यांचा कार्यक्रम झाला. यावर प्रसारमाध्यमांतून टीका झाली. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी या परिचारीकांवर कठोर कारवाई करावी यासाठी जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला. त्रिसदस्यीय समितीची स्थापनेचे नाटक करण्यात आले. जाबजबाबही नोंदविले. मात्र या परिचारिकांना फक्त सक्त ताकीद देण्यात आली आहे. शासकीय सोडून इतर कार्यक्रम घेऊ नये असे बजाविल्यचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

जिल्हा रुग्णालयात नेहमीच भोंगळ कारभार सुरू असतो. या न त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहते. वैद्यकीय महाविद्यालयात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात साऊंड सिस्टिम लावून परिचारिकांनी लावणी व मराठी हिंदी गाण्यावर अदाकारी नृत्य केले. यात सर्व परिचारिकांचा सहभाग होता. चक्क कर्तृत्वावर असलेल्या ड्रेसकोडवर एका परिचारिकेने नृत्य केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अन्‌ यावर कुठलीही कारवाई न करता फक्त सक्त ताकीद देण्यात आली. हा प्रकार म्हणजे मी मारल्यासारखे करेल तू रडल्यासारखे कर असा आहे. 
 
काय म्हणाले अधिष्ठाता 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या प्रकरणाविषयी त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली होती. त्यांनी आज सर्व 14 परिचारिकांचे जबाब नोंदवून अहवाल दिला. यात परिचारिकांनी आमची मोठी चूक झाली आहे. असा कार्यक्रम घ्यायला नको होता. या प्रकरणात आम्हाला माफ करावे. भविष्यात अशी चूक होणार नाही असे म्हटले आहे. तसेच कक्षप्रमुख ऋषी ढोले व रुग्णांच्या नातेवाइकांचा जबाब घेतला. यात म्हटले आहे, की ही रूम बाजूला आहे. हा कार्यक्रम बंद रूममध्ये झाल्याने बाहेर आवाज आला नाही. याचा रुग्णांना किंवा नातेवाइकांना काही त्रास झालेला नाही. यातील परिचारिका त्यादिवशी ड्यूटीवर नव्हत्या. एकच परिचारिका ड्यूटीवर होती. तिची ड्यूटीही त्या ठिकाणी नव्हती यामुळे या परिचारिकांना सक्त ताकीद दिली आहे. शासकीय वगळता इतर कार्यक्रम घेऊ नये अशा आशयाची नोटीस बजाविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com