"त्या' मीटर रीडरला कामावरून काढण्याचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जळगाव : शहरातील शिवकॉलनी व कोल्हेनगर परिसरातील वीज ग्राहकांकडे पैशांची मागणी करणाऱ्या "त्या' मीटर रीडरला तत्काळ कामावरून कमी करण्याचे आदेश "महावितरण'ने सबंधित ठेकेदाराला आज दिले आहेत. 
शहरातील शिवकॉलनी, कोल्हेनगर परिसरातील वीज ग्राहकांकडून मीटर रिडिंगसाठी येणारा कर्मचारी पैशांची मागणी करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. याबाबत "सकाळ'ने आज वृत्त प्रकाशित केले. याची दखल "महावितरण'कडून घेण्यात आली असून, संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्याचे आदेश ठेकेदाराला आज देण्यात आले. 

प्रलोभनाला बळी पडू नये 
मीटर रीडरकडून ग्राहकांना मीटर रीडिंग कमी टाकतो, वीजबिल कमी येईल वा अन्य प्रलोभने दाखविण्याचे प्रकार घडतात. मात्र, मीटर रीडरने नोंदविलेल्या मीटर रीडिंगची फेरपडताळणी महावितरणकडून केली जाते. महावितरण कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केल्यानंतर संचित मीटर रीडिंग आढळून आल्यास पुर्वलक्षी प्रभावाने ग्राहकांकडून वीज बिलाची वसुली केली जाते. तेव्हा वीज ग्राहकांनी प्रलोभनाला बळी पडू नये. तसेच घरी वा परिसरात वीजमीटर रीडिंग, वीजमीटर तपासणी, वीजबिल वसुली वा वीजविषयक इतर कामासाठी भेटी देणारे मीटर रीडर, जनमित्र (लाइनस्टाफ) व इतर कर्मचारी अनोळखी वाटल्यास ओळखपत्राची मागणी करण्याचे कळविले आहे. 

लेखी तक्रार करण्याचे आवाहन 
वीज मीटर रीडिंग करणाऱ्या मीटर रीडरने कोणत्याही कारणासाठी आर्थिक मागणी केल्यास ग्राहकांनी "महावितरण'च्या संबंधित शाखा, उपविभाग, विभाग कार्यालयास लेखी तक्रार दाखल करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon meter riding mahavitaran