एमआयडीसी परिसरात केमिकल कंपनीला भिषण आग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

जळगाव ः औद्योगिक वसाहत परिसरातील रवी केमिकल्स या कंपनीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने मोठे रूद्र रूप धारण केले असून, अग्निशमण दलाच्या बंबानी आग विझविण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. 

जळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील व्ही सेक्‍टरमधील रवी केमिकल्स कंपनीला आज सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, आगीचे नेमके कारण समजलेले नाही. केमिकलच्या प्लॅस्टिकच्या कॅन्स असून आगीने रौद्र रूप धारण केले असून अर्धा तासापासून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील आग आटोक्‍यात आलेली नाही. केमिकल पेटत असून येथे लहान- मोठे स्पोट देखील होत आहेत. कंपनीतील कर्मचारी आग लागताच बाहेर निघाले असून, यात काही जीवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon midc cemical compny fire