दूध उत्पादन दहा टक्‍क्‍यांनी घटले 

दूध उत्पादन दहा टक्‍क्‍यांनी घटले 

जळगाव : यंदा एप्रिलच्या शेवटी जवळपास 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, अजूनही तापमानात दररोज चढ उतार होत असून माणसांसह पशू- पक्ष्यांना त्याची झळ लागत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पशूधनाला फटका बसला असून दूध उत्पादनात सरासरी दहा टक्‍क्‍यांची घट झाली आहे. 
खानदेशातील उन्हाळ्याची तीव्रता दरवर्षी जाणवते. आता एप्रिलमध्येच तापमान 43 ते 45 अंशांवर पोचले आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या पशूंमध्ये उष्माघाताची शक्‍यता बळावली आहे. दरवर्षीच एप्रिल च्या अखेरीस उन्हाची तीव्रता वाढते यंदा तर मार्च पासूनच अंगाची लाही लाही होत आहे. सद्यःस्थितीत जंगलातील पाणवठे कोरडे ठणठणीत पडले आहेत तसेच बहुतांश जलसाठा आहे. 
त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे, पाणी कमी झाल्याने तलावात गाळ असतो या गाळामध्ये पाय फसण्याची दाट शक्‍यता असते. त्यामुळे जंगल परिक्षेत्रातील सर्व पाणवठ्यांमध्ये वनविभागाने पाणी सोडण्याची तसेच आवश्‍यक त्या ठिकाणी नव्याने कृत्रिम पाणवठे निर्माण करण्याची मागणी वन्यप्रेमी व प्राणीमित्र संघटनांकडून केली जात आहे. 
 
दूध उत्पादनात घट 

उन्हाळ्यात पशूंना पाण्याची आवश्‍यकता असते शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास रक्त निर्मिती कमी होते. पर्यायाने दूध निर्मिती घटते. यामुळे उन्हाळ्याच्या तापमानाचा फटका दूध उत्पादनावर दिसून येतो. सद्य:स्थितीत दूध उत्पादनात नेहमीपेक्षा दहा टक्‍क्‍यांची घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
अशी घ्या काळजी 
- जनावरे सावलीत ठेवा 
- लवकर न तापणारे छत वापरा 
- दोन जनावरात दोन- तीन फुटाचे अंतर ठेवा 
- गोठ्याचे छत 15 फुटापेक्षा अधिक उंच ठेवा 
- सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जनावरांना गोठ्याबाहेर सोडू नका 
- रात्रीच्या वेळी जनावरे मुक्त संचार पद्धतीनं सांभाळा 
- जनावरांना आहार दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 6 पर्यंत पुरवा 
- दुपारच्या वेळी तुषार थेंबांनी अंग छत थंड करा 
- गोठ्याच्या छतास पांढरा रंग द्या 

जिल्ह्यातील दुभती जनावरे 

संकरित जनावरे - 30523 
गावठी / देशी जनावरे - 61832 
म्हैस वर्ग - 98,587 

एकूण संख्या - 1,90,942 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com