बीएस्सी कृषी प्रवेशासाठी 5 जुलैपर्यंत अर्जाची मुदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

जळगाव : बी. एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाला यंदा प्रथमच "सीईटी'च्या गुणांवर आधारित प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासह आवश्‍यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी संकेतस्थळावर अपलोड करण्याची अंतिम मुदत पाच जुलै आहे. 

जळगाव : बी. एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाला यंदा प्रथमच "सीईटी'च्या गुणांवर आधारित प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासह आवश्‍यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी संकेतस्थळावर अपलोड करण्याची अंतिम मुदत पाच जुलै आहे. 
कृषी अभ्यासक्रमाची सप्टेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. प्रवेशासाठी आवश्‍यक अर्हतेसह अन्य विविध माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रियेला सोमवारपासून (ता. 11) सुरवात झाली आहे. सामान्य जागांसाठी व महाविद्यालय पातळीवरील जागांसाठीचे स्वतंत्र वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतील महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम घेण्यात येतो. 

महाविद्यालयांच्या कोट्यातील जागा 
महाविद्यालय स्तरावरील कोट्यातून प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 ते 14 ऑगस्टदरम्यान लॉगइनच्या सहाय्याने इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी अर्ज भरता येणार आहेत. या कोट्यासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांची नावे अंतिम गुणवत्तायादीत असणे आवश्‍यक आहेत. प्राप्त अर्जांच्या आधारावर संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळांवर 18 ऑगस्टला गुणवत्तायादी जाहीर केली जाईल. यानंतर गुणवत्तायादीच्या आधारावर महाविद्यालयांत प्रवेशासाठी 21 ते 24 ऑगस्टदरम्यान प्रवेश निश्‍चित करावे लागेल. यानंतर 25 ऑगस्टला अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

प्रवेशाचे वेळापत्रक....... 
- अर्ज भरणे व कागदपत्रे अपलोडची मुदत ः 5 जुलैपर्यंत 
- विलंब शुल्कासह प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत ः 7 जुलै 
- प्रारूप गुणवत्तायादी संकेतस्थळावर जाहीर होणार ः 13 जुलै 
- ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची मुदत ः 17 जुलैपर्यंत 
- अंतिम गुणवत्तायादी जाहीर होणार ः 23 जुलै 
- पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर होणार ः 26 जुलै 
- विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अंतिम मुदत ः 30 जुलै (सायंकाळी 5.30 पर्यंत) 
- रिक्‍त जागांचा तपशील जाहीर होणार ः 31 जुलै 
- दुसऱ्या फेरीसाठी निवड यादी जाहीर होणार ः 3 ऑगस्ट 
- विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अंतिम मुदत ः 6 ऑगस्ट (सायंकाळी 5.30 पर्यंत) 
- रिक्‍त जागांचा तपशील जाहीर होणार ः 7 ऑगस्ट 
- तिसऱ्या फेरीसाठी निवड यादी जाहीर होणार ः 9 ऑगस्ट 
- विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी अंतिम मुदत ः 13 ऑगस्ट 
- रिक्‍त जागांचा तपशील जाहीर होणार ः 14 ऑगस्ट 
- चौथ्या फेरीसाठी निवड यादी ः 16 ऑगस्ट 
- विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी अंतिम मुदत ः 20 ऑगस्ट 
- रिक्‍त जागांचा तपशील जाहीर होणार ः 21 ऑगस्ट 
- प्रवेश निश्‍चितीसाठी मूळ कागदपत्रे व विहित शुल्क विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात भरण्याची मुदत ः 16 ते 21 ऑगस्ट 
 

Web Title: marathi news jalgaon mishation admetion