वीज ग्राहकांच्या घरावर बसणार नवीन मीटर! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

वीज ग्राहकांच्या घरावर बसणार नवीन मीटर! 

वीज ग्राहकांच्या घरावर बसणार नवीन मीटर! 

जळगावः वीज ग्राहकांच्या घरावर असलेले इलेक्‍ट्रो मॅग्नेटिक मीटर (चक्रीमीटर) बदलविण्याचे काम "महावितरण'कडून सुरू झाले आहे. या मोहिमेत फॉल्टी आणि जुने मीटर बदलविण्याचे काम केले जाणार असून, खानदेशातील 1 लाख 30 हजार 345 ग्राहकांकडील मीटर बदलविण्यात येणार आहेत. 
"महावितरण'च्या जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार मंडळातील विभागांमध्ये मीटर वीज ग्राहकांकडून होणाऱ्या मागणीनुसार उपलब्ध आहे. बऱ्याचदा ग्राहकांकडून मागणी होताना देखील मीटर उपलब्ध होत नसल्याने प्रतीक्षा होती. परंतु, जानेवारीमध्ये परिमंडळात 57 हजार 550 मीटर उपलब्ध झाले होते. नवीन कनेक्‍शनसाठी अर्ज करणाऱ्यांना मीटर मिळत नव्हते. पण मीटर उपलब्ध झाल्यामुळे ही समस्या दूर झाली होती. तर "महावितरण'कडून आता मीटर बदलविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जुने मीटर काढून नवीन जीनस आणि एल ऍण्ड टी कंपनीचे नवीन मीटर बसविण्यात येणार आहेत. 

खानदेशात सव्वा लाख नवीन मीटर 
"महावितरण'कडून नवीन इलेक्‍ट्रॉनिक मीटर बसविण्याकरिता फॉल्टी आणि जुने चक्रीमीटर काढून घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांकडून मीटरबाबत तक्रारी असलेल्या 61 हजार 511 फॉल्टी मीटर आणि 68 हजार 834 इलेक्‍ट्रो मॅग्नेटिक मीटर असे खानदेशातून एकूण 1 लाख 30 हजार 345 मीटर बदलविण्यात येणार आहेत. जळगाव मंडळातून 97 हजार 846 मीटर बदलविण्याचे काम केले जाणार आहे. 
 

Web Title: marathi news jalgaon mitar