Loksabha 2019 : आमदार अनिल गोटेंची बंडखोरी करत उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

धुळे ः भाजपचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार अनिल गोटे यांनी लोकसभेच्या धुळे मतदारसंघात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा निर्णय आज जाहीर केला. निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. 9) अर्ज भरणार असून, मतदारसंघाचा खुंटलेला विकास साध्य करण्यासाठी उमेदवारी करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
भाजपचे खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना पराभूत करण्यासाठी उमेदवारी करणार असल्याचे आमदार गोटे यांनी पूर्वी जाहीर केले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी पाडण्यासाठी नाही, तर आता माझ्या विजयासाठी उमेदवारी करत असल्याची भूमिका मांडली. 

ते म्हणाले, की तिसरा पर्याय म्हणून मतदारसंघात मला चांगली पसंती, त्यामुळे विजयाची संधी असल्याने उमेदवारीचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाबाबत तांत्रिक आणि प्रशासकीय काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यास मंजुरी, "डीपीआर' झालेला नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना माझ्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचे सांगत मंत्री डॉ. भामरे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाचा विकास केला नाही, अशी टीकाही आमदार गोटे यांनी केली. 

Web Title: marathi news jalgaon MLA gote candidate