मोदींच्या शपथविधीचा जळगावात जल्लोष 

live photo
live photo

जळगाव : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर या शपथविधी सोहळ्यानिमित्त जळगावात जल्लोष करण्यात आला. भाजपने फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला. तर जिल्हा तेली समाज शिक्षण मंडळातर्फेही जल्लोष करण्यात आला. 
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमतासह मित्रपक्षांच्या सहकार्याने रालोआचे सरकार स्थापन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा रालोआने विजय प्राप्त करत सत्ता स्थापन केली. नरेंद्र मोदी यांनी आज सात वाजता दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या सोहळ्याचा उत्साह जळगावात साजरा करण्यात आला. 

भाजप कार्यालयासमोर आज फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी महापौर सीमा भोळे, अस्मिता पाटील, रेखा कुळकर्णी, मनपातील गटनेते भगत बालाणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. तर तेली समाज शिक्षण मंडळाच्या वतीनेही फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com