पोलिस चार फूट हवेत कशामुळे... 

पोलिस चार फूट हवेत कशामुळे... 

जळगाव : शहरातील चित्रा चौकात रात्री आठच्या सुमारास टॉवर चौकाकडून सुसाट वेगात येणाऱ्या ट्रिपलसीट मोटारसायकलस्वाराने चक्क पोलिसालाच धडक दिली. दुचाकीच्या धडकेत पोलिस कर्मचारी हवेत चार फूट उंच फेकले जाऊन जमिनीवर आदळल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जळगाव शहरातील बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यात काही केल्या पोलिसांना यश येताना दिसून येत नाही. विनाक्रमांक प्लेट दुचाकीस्वार, विचित्र नंबरप्लेटची वाहने असोत की वाळू वाहतूकदारांचे विना परवाना ट्रॅक्‍टर- डंपर असोत बेशिस्त वाहनधारकांना कायद्याचे भय नसल्याची शहरात परिस्थिती निर्माण झाली आहे. 

वाहतूक पोलिसाचा अपघात 
बुधवारी (ता. 11) पोलिस कर्मचारी महेंद्र युवराज पाटील (वय 33) यांची चित्रा चौकातील सिग्नलवर ड्यूटी होती. रात्री आठच्या सुमारास टॉवरकडून सुसाट वेगात येणाऱ्या मोटारसायकल (एमएच 15 बीएल 5281) चालकाला वाहन थांबवण्याचा इशारा महेंद्र पाटील यांनी केला. मात्र, सिग्नल बंद असताना चालकाने त्याची परवा न करता वाहनाचा वेग वाढवत चौकात उभ्या असलेल्या महेंद्र पाटील या गणवेशातील पोलिस कर्मचाऱ्याला धडक दिली. ड्युटीवरील पोलिस कर्मचारी संतोष सोनवणे यांनी मदतीला धाव घेतली, पळून जाणाऱ्या दुचाकीस्वारास त्यांनीही पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रिपलसीट दुचाकीवर सर्वांत मागे बसलेल्या तरुणाला पकडण्यात त्यांना यश आले उर्वरित दोघे पसार झाले. 

पोलिस फुटबॉल प्रमाणे हवेत 
हा अपघात इतका भयानक होता की, थोडक्‍यात पोलिस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. सुसाट वेगातील दुचाकीस्वाराने समोरून धडक दिल्यावर महेंद्र पाटील तब्बल चार फुटापर्यंत हवेत चेंडूसारखे उडाले. नंतर खाली कोसळल्यावर त्याच्या कंबरेला, पाठीवर आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. 

तिघांची ओळख पटली.. 
या घटनेत दुचाकीवरील संतोष सोनवणे याची पोलिसाने जागीच कॉलर धरत एका संशयितास दुचाकीवरून ओढले. तर त्याच्यासोबत दुचाकीस्वार दुष्यंत देवानंद आखाडे (रा. अयोध्यानगर) हा वाहन चालवत होता. मध्यभागी मंगेश मारुती जाधव असल्याचे पकडण्यात आलेल्या आश्‍विन पाटील याने माहिती देताना सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com