जळगाव-अहमदाबाद-मुंबई विमानसेवेस एक ऑगस्टपासून प्रारंभ : खासदार उन्मेष पाटील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

जळगाव : जळगाव-अहमदाबाद-मुंबई विमानसेवेतील सर्व अडथळे आता दूर झाले असून, एक ऑगस्टपासून "ट्रू जेट' कंपनीच्या माध्यमातून या सेवेस प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. संसदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री हरिदीपसिंग पुरी यांनी ही माहिती दिल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. 

लोकसभेत प्रश्‍नकाळात तारांकित प्रश्‍नांतर्गत खासदार उन्मेष पाटील यांनी जळगावच्या विमानसेवेचा प्रश्‍न उपस्थित केला होता. उड्डाण सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आली. मात्र, जळगाव विमानतळावरून जळगाव, अहमदाबाद, मुंबई सेवा अद्यापही सुरू झालेली नाही, तसेच जळगावहून पुणे येथे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, तरीही सेवा सुरू केली जात नाही. तसेच यापूर्वी जळगाव - मुंबई सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, ती बंद करण्यात आली. 
यावेळी उत्तर देताना हरिदीपसिंग पुरी यांनी सांगितले, की जळगाव-अहमदाबाद-मुंबई सेवेच्या परवानगीचे सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. "ट्रू जेट' कंपनीच्या माध्यमातून ही सेवा एक ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल, तसेच जळगाव-पुणे विमानसेवेसाठी नवीन निविदा मागवून ती देखील सेवा सुरू करण्यात येईल. तर जळगाव-मुंबई सुरू करण्यात आलेली विमानसेवा अचानक बंद करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारे कंपन्यांनी विमानसेवा बंद करू नये, यासाठी कायद्यात दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात येईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mumbai aroplane 1 augst unmesh patil