शहरातील नागरिकांचा मनपा काढणार विमा : आमदार सुरेश भोळे 

शहरातील नागरिकांचा मनपा काढणार विमा : आमदार सुरेश भोळे 

जळगाव ः महापालिकेने 2019-20 च्या आर्थिक अंदाजपत्रकात शहरातील नागरिकांचा विमा काढण्यासाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. त्यानुसार विमा कंपनीशी बोलणी सुरू आहे, तसेच आयुक्तांशी चर्चा करून शहरातील सर्व नागरिकांचा विमा महापालिकेतर्फे काढण्याबाबत विचार असल्याचे मत आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. 
महापौरांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर सीमा भोळे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, ऍड. दिलीप पोकळे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे आदी उपस्थित होते. 
आमदार भोळे म्हणाले, की शहरात दिवसेंदिवस दुर्देवी घटना घडत असून, त्यामुळे सर्व नागरिकांचा विमा काढला जाणार आहे. यासाठी नागरिकाला आधार, रेशनकार्ड आदी आवश्‍यक कागदपत्रे देऊन शहरातील नागरिक असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. यात 12 रुपयांत 2 लाखाचा विमा निघणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली. 

मूलभूत सुविधांवर भर देणार 
"हुडको' कर्जामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. शासनाने हे कर्ज फेडण्याचा निर्णय घेतल्याने आता जळगावकरांना मूलभूत सुविधा देण्यासाठी लक्ष देता येणार आहे. तसेच 42 कोटींतील कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील, असे आमदारांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com