शंभर कोटीच्या कामाचा लवकरच शासनाकडे प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

जळगाव ः नगरोत्थान योजनेअंतर्गत महापालिकेला शासनाकडून 100 कोटी मंजूर झाले आहे. या निधीतून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये रस्ते, गटारी तसेच मूलभूत सुविधांचे विविध कामे केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळाली असून लवकरच विकास आराखडा तयार करून तो आठवड्याभरात शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती आमदार सुरेश 
भोळे यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आज सायंकाळी आमदार भोळे यांनी महापालिकेच्या विविध प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी शासनाकडून मंजूर झालेल्या शंभर कोटीच्या कामांबाबत प्रस्ताव, विकास आराखडा कुठपर्यंत तयार झाला आहे. याची माहिती बांधकाम अभियंता सुनील भोळे यांच्याकडून घेतली. तसेच लवकरात लवकर विकास आराखडा तयार करून आठवड्याभरात शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या. 

शंभर कोटीतून 162 कामे 
मुख्यमंत्र्यांनी 100 कोटीच्या निधीतून सिमेंट क्रॉकीटचे रस्ते तयार करण्याचे सूचना दिल्या होत्या. परंतु निधी अधिक लागत असल्याने 40 कोटीतून शहरातील मुख्य पाच रस्त्यांचे डांबरीकरण तसेच चौक सुशोभीकरण, 50 कोटीतून गटारी, संरक्षण भिंत आदी विविध असे एकूण 162 कामे होणार आहेत. 
........ 
दहा कोटी आमदार निधीसाठी 
शंभर कोटीच्या निधीतून 10 कोटी हे आमदार निधीसाठी राखीव आहेत. या दहा कोटीच्या निधीतून प्रभागांमध्ये विविध विकास कामे केली जाणार आहेत. 
.. 
काही प्रभागात गटारी, रस्ते 
शंभर कोटी निधीच्या कामांमध्ये काही प्रभागात अमृत योजने अंतर्गत जलवाहिनी खोदण्याचे काम तसेच भूमिगत गटारी योजनेतून भूमिगत गटारी तयार करण्यासाठी रस्ते खोदले जाणार आहेत. प्रभाग 1 ते 6, 15 पूर्ण, तर 13,14,16,19 या प्रभागातील अर्ध्या भागात हे काम होणार नाही. परंतु अन्य मूलभूत कामे केली जाणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation 100 carore