महापालिका निवडणुकीपूर्वीच वाद सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

जळगाव : आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रभाग रचना जाहीर झाल्या असून त्यानुसार इच्छुकांनी जनसंपर्कासह तयारीला सुरवात केली आहे. शहरातील दाट लोकवस्त्यांमध्ये तरुण कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू असून हमरीतुमरीचे प्रकारही घडू लागले आहेत. पिंप्राळ्यातील नगरसेवक चंदकांत कापसे यांच्या घराजवळून ये-जा करण्याच्या कारणावरून रवींद्र साळुंखे यांच्याशी वाद होऊन कापसे गटाने त्यांची स्विफ्ट कार फोडल्याची घटना काल (ता. 23) रात्री साडेआठ नऊच्या सुमारास घडली. 

रामानंदनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे, घराकडे आल्याच्या शुल्लक कारणावरून कापसे गटाने वाद घालून रवींद्र साहेबराव साळुंखे यांचे वाहन थांबवून वाद घातला. सांळुखे यांच्या स्विफ्ट कार क्र (एमएच.19.बीयु.)ला घेराव घालून तोडफोड करून रवींद्र साळुंखे यांना मारहाण केली. साळुंखे यांनी नगरसेवक चंद्रकांत शंकर कापसे, दगडू पाटील यांच्यासह इतर दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तर, कापसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा न्यायालयात (ता.24 मे) साक्ष असल्याने, जुन्या भांडणाच्या कारणावरून साळुंखे यांनी वाद उकरून काढत हुज्जत घालत शिवीगाळ दमदाटी केल्याचे नमूद केले असून तपास पोलिस नाईक अरुण चौधरी करीत आहे. 
 
निवडणुकांच्या वादाची चर्चा 
पिंप्राळा परिसरातून अनेक इच्छुकांपैकी रवींद्र साळुंखे आगामी निवडणुकांसाठी तयारी करीत असून नगरसेवक चंद्रकांत कापसे यांच्या परिसरात कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी सुरु केल्यावरून वाद असल्याचा पोलिसांचा अंदाज असून मनपा निवडणुकांच्या तयारीतूनच कालचे भांडण झाले असल्याची परिसरात चर्चा आहे. 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation