"मनपा'तर्फे मालमत्ता कराची 70 टक्के वसुली 

"मनपा'तर्फे मालमत्ता कराची 70 टक्के वसुली 

जळगाव ः महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आजपर्यंत महापालिकेची 70 टक्के वसुली झाली असून, उद्या (31 मार्च) मालमत्ता कर भरणा करण्याची शेवटची मुदत असल्याने महापालिकेची सर्व प्रभाग कार्यालये कर भरण्यासाठी उघडी राहणार आहेत. 
जळगाव शहरात महापालिका हद्दीत 80 हजार मिळकती असून, 20 मार्चला सुमारे 60 टक्के मालमत्ता कराची वसुली झाली, तरी उर्वरित मालमत्ता करवसुलीचा उद्या (31 मार्च) अंतिम दिवस आहे. त्यामुळे उद्या (31 मार्च) चारही प्रभाग समित्यांची कार्यालये सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत उघडी राहून मालमत्ता कर स्वीकारणार आहेत. परंतु वसुली विभागातील अनेक कर्मचाऱ्यांची निवडणूक ड्यूटी लागल्याने कर भरण्याच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असणार आहे. 

86 कोटींचे उद्दिष्ट; वसुली 70 टक्के 
दरवर्षी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठरविले जाते. त्यानुसार 2018-19 च्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट 86 कोटींचे होते. त्यानुसार 30 मार्चपर्यंत चारही प्रभाग समित्यांच्या वसुलीचा आकडा 70 टक्के होता. आतापर्यंत 45 कोटी दोन लाख 57 हजार 230 रुपये वसूल झाले आहेत, तर आज चारही प्रभाग समित्यांमध्ये 45 लाख 72 हजार रुपये कर भरणा झाला; तर 12 लाखांचे धनादेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले. 

पाच टक्के वसुलीत वाढ 
मागील 2017-18 या वर्षाची करवसुली 65 टक्के होती. यावर्षी मालमत्ता वसुलीची मोहीम जोरदार राबविल्याने तसेच नागरिकांमध्ये कर भरण्याची जागरूकता वाढल्याने पाच टक्के वाढ झाली आहे, तर मागील थकबाकीही 60 टक्के वसूल केली आहे. 

एप्रिलमध्ये कर भरल्यास 10 टक्के सूट 
2019-20 या वर्षातील एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत बिले वाटप करण्यात येणार असून, एप्रिलमध्ये भरणा करणाऱ्यांना 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच जुलैपर्यंत भरणाऱ्यांना सवलत दिली जाणार असून, जुलैनंतर दोन टक्के व्याज लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com