"अमृत'चे कनेक्‍शन हवे, तत्काळ थकबाकी भरा! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

जळगाव ः महापालिकेतर्फे अमृत योजनेच्या जलवाहिनीवर नळ कनेक्‍शन देण्यात येणार आहे. मात्र, हे नवीन कनेक्‍शन देताना जुनी थकबाकी भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. थकबाकी नसलेल्या मिळकतधारकांचे कनेक्‍शन नवीन जलवाहिनीवरून देण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. 

जळगाव ः महापालिकेतर्फे अमृत योजनेच्या जलवाहिनीवर नळ कनेक्‍शन देण्यात येणार आहे. मात्र, हे नवीन कनेक्‍शन देताना जुनी थकबाकी भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. थकबाकी नसलेल्या मिळकतधारकांचे कनेक्‍शन नवीन जलवाहिनीवरून देण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. 
शहरातील जुन्या जलवाहिन्यांमुळे अनेक भागांत पाणी वितरणात अडथळा होता. त्यामुळे अनेक भागांत नळांना पाणी येत नव्हते. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून "अमृत' योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील सर्व जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. त्यासाठी मक्ता देण्यात आला असून, त्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. अनेक भागांत जलवाहिनी टाकण्याचे कामही झाले आहे. 

जलवाहिनीवरून नवे कनेक्‍शन 
ज्या भागात जलवाहिनी टाकण्यात आली आहे, तेथील नळकनेक्‍शन आता या अमृत योजनेच्या जलवाहिनीवरून देण्यात येणार आहे. मात्र महापालिकेने आता त्यासाठी अट घातली आहे. त्यांना या नवीन जलवाहिनीवरून कनेक्‍शन घ्यायचे असेल त्यांनी महापालिकेच्या सन 2018-19 पर्यंतच्या मालमत्ताकराच्या तसेच पाणीपट्टीच्या रकमा भरायच्या आहेत. कर भरल्याच्या पावत्या महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात सादर करून नागरिकांनी नवीन जलवाहिनीवरून नळकनेक्‍शन जोडून घ्यावयाचे आहे. मात्र, जर थकबाकी असेल तर मात्र नवीन जलवाहिनीवरून कनेक्‍शन मिळणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे ज्यांनी कराच्या व पाणीपट्टीच्या रकमा भरलेल्या आहेत त्यांनी त्या पावत्या त्वरित दाखवून नवीन जलवाहिनीवरून कनेक्‍शन जोडून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

जानेवारीपासून दंड आकारणी 
महापालिकेतर्फे सन 2018-19 च्या मालमत्ताकराचा भरणार स्वीकारण्यात येत आहे. नागरिकांनी त्वरित त्याचा भरणा करायचा आहे. 31 डिसेंबरपूर्वी भरणार करण्याऱ्या नागरिकांना तीन टक्के सूट देण्यात येणार आहे. मात्र 1 जानेवारी 2019 पासून थकबाकीवर 2 टक्के दंड आकारण्यात येणार आहे. नागरिकांनी त्वरित घरपट्टी भरावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation amrut yojna cannection

टॅग्स