महापालिकेची बॅंक खाती "सील'प्रकरणी मार्ग काढा : आमदार भोळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

जळगाव : महापालिकेची बॅंक खाती हुडकोने सील केल्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. या प्रकरणी शासनाने त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी विधिमंडळात केली आहे. 
पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनद्वारे आमदार भोळे यांनी विधिमंडळात प्रश्‍न मांडला. ते म्हणाले की, जळगाव महापालिकेचे बॅंक खाती हुडको कर्जामुळे सील करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत लवकरात लवकर मार्ग काढून बॅंक खात्याचे सील काढावे. 

मराठा समाज आरक्षणाचे स्वागत 
मराठा समाजाला आरक्षण मंजूर करण्याचा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आमदार भोळे यांनी स्वागत केले आहे. याबाबत "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, आपण न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, सरकारनेही समाजाला आरक्षण मिळण्यासाठी न्यायालयात बाजू समर्थपणे मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेही अभिनंदन. 
 
हुडकोच्या अधिकाऱ्यांशी आज बैठक 
हुडकोच्या अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या (ता. 28) ही बैठक होत आहे. त्यात जळगाव महापालिकेच्या बॅंक खाते सीलप्रकरणी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे उपस्थित राहणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation bank sill MLA bhole