षडयंत्र कुणाचे? आयुक्तांवर "अविश्‍वास' आणा : शिवसेनेचे "मनपा'तील गटनेते लढ्ढा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

जळगाव : शहरातील अतिक्रमण हटाव षडयंत्र असेल तर ते कुणाचे आहे? हे आमदार सुरेश भोळे यांनी जाहीर करावे. आयुक्तांवर त्यांचा आक्षेप असेल, तर त्यांच्यावर अविश्‍वास आणावा तेवढे संख्याबळ महापालिकेत पक्षाकडे आहे. अन्यथा आम्ही महापालिकेत कामकाज चालविण्यासाठी असमर्थ आहोत, असे जाहीर करावे, असे आवाहन शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते नितीन लढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत केले. 

सतरा मजली इमारतीतील सोळाव्या मजल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, प्रशांत नाईक उपस्थित होते. श्री. लढ्ढा म्हणाले, की शहरातील "अतिक्रमण हटाव'अंतर्गत कारवाई षडयंत्र असल्याचा आरोप भाजपचे आमदार भोळे यांनी केला आहे. जर केंद्रात, राज्यात आणि जळगाव महापालिकेतही भाजपची सत्ता आहे, तर मग षडयंत्र नेमके कोण करीत आहे, हे त्यांनी जाहीर करावे. 

आयुक्तांवर अविश्‍वास आणावा 
आमदार भोळे यांनी महापालिका आयुक्तांवर संशय व्यक्त केल्याचे दिसत आहे, असे मत व्यक्त करून लढ्ढा म्हणाले, की जर आयुक्त षडयंत्र करीत असतील, तर त्यांनी आयुक्तांवर अविश्‍वास ठरावा आणावा, त्यासाठी 52 सदस्यांची आवश्‍यकता असते. भाजपकडे तब्बल 57 सदस्य आहेत. 

"मनपा' चालविण्यास भाजप असमर्थ ः महाजन 
भाजपचे आमदार भोळेंवर टीका करताना विरोधी पक्षनेते सुनील महाजन म्हणाले, की अतिक्रमण काढण्याबाबत ते आयुक्तांवर टीका करीत आहेत. मात्र, राज्यातही त्यांचीच सत्ता आहे. त्यामुळे ही केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. महापालिकेचा कारभार चालविण्यात भाजप असमर्थ ठरल्याचे दिसत आहे. त्यांनी आता हे जनतेसमोर जाहीर करावे. 
 
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation comisaner