पदभार घेण्यासाठी आलेले नवे आयुक्‍त अडकले लिफ्टमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

जळगाव ः महापालिकेत आयुक्‍त म्हणून पंधरा दिवसांपुर्वी नियुक्‍ती करण्यात आलेले उदय टेकाळे हे आज पदभार घेण्यासाठी आले होते. महापालिकेच्या तेराव्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात जाण्यासाठी लिफ्टमधून जात असताना चौथ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडल्याने नवीन आयुक्‍त लिफ्टमध्ये अडकले होते. 

महापालिकेचे आयुक्‍त चंद्रकांत डांगे यांच्या जागेवर डॉ. उदय टेकाळे यांची पंधरा दिवसांपुर्वी नियुक्‍ती करण्यात आली होती. परंतू, आजारपणामुळे टेकाळे येवू न शकल्याने आज (ता.15) महापालिकेच्या आयुक्‍त पदाचा पदभार घेण्यासाठी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आले होते. आयुक्‍तांचे दालन महापालिका इमारतीच्या तेराव्या मजल्यावर असल्याने दालनात जाण्यासाठी पहिल्या मजल्यावरून लिफ्टमध्ये बसले. मात्र लिफ्ट चौथ्या मजल्यापर्यंत गेल्यानंतर अचानक बंद पडल्याने नवीन आयुक्‍त टेकाळे अडकले होते. साधारण तीन- चार मिनिट लिफ्टमध्ये अडकले होते. यानंतर लिफ्टचा दरवाजा उघडल्यावर आयुक्‍तांना बाहेर काढले. येथून दुसऱ्या लिफ्टने ते तेराव्या मजल्यावर जावून पदभार स्विकारला. 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation comitioner lift