जळगाव मनपासाठी 1ऑगस्टला मतदान; आजपासून आचारसंहिता जारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

ळगाव : जळगाव, सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेसाठी तसेच वसई विरारच्या प्रभाग क्रमांक 97च्या रिक्त नगरसेवकपदाच्या पोटनिवडणूकीसाठी 1 ऑगस्टला मतदान होणार असून 3 ऑगस्टला मतमोजणी होईल. आजपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. 
राज्य निवडणूक आयोगातर्फे आज दोन्ही महापालिका निवडणूकीचा आणि वसई विरार महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 97 च्या पोटनिवडणूकीसाठी अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या महापालिका क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याची घोषणाही करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यात येणार आहेत. 

निवडणूक कार्यक्रम असा. 
उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्याचा तारीख:4 जुलै 
अर्ज स्विकारण्याची अंतीम मुदत :11जुलै 
अर्जाची छाननी :12 जुलै 
उमेदवार यादी :12जुलै 
अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत :17जुलै 
मतदान :1 ऑगस्ट 
मतमोजणी :3 ऑगस्ट

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation election 1 augst