खर्च सादर न करणाऱ्या 80 उमेदवारांना नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

जळगाव ः जळगाव महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना दैनंदिन खर्च हा ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. 303 उमेदवारांनी ऍपवर नोंदणी केली मात्र, 80 उमेदवारांनी अद्याप आपला दैनंदिन खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे निवडणूक खर्च विभागाकडून खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाली आहे. 

निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची माहिती ही "ट्रू वोटर' या ऍपवर सादर करणे बंधनकारक आहे. तशा सूचना निवडणूक विभागाने देवून पंधरा दिवस उलटूनही 80 उमेदवारांनी एकाही दिवसाचा खर्च सादर केलेला नाही. याबाबत सर्व उमेदवारांना निवडणूक विभागाकडून मोबाईलवर संदेश देवून खर्च सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, तरीही या उमेदवारांनी आपला खर्च सादर न केल्याने त्यांना आज नोटीस बजाविल्या आहे. 

खर्च सादर केल्यास गुन्हा दाखल 
खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना नोटीस बजावल्यानंतर 24 तासाच्या आत आपला खुलासा सादर करण्याचा सूचना या नोटीसीव्दारे दिल्या आहेत. त्यामुळे उद्यापर्यंत या उमेदवारांनी खुलासा व खर्च सादर न केल्यास या उमेदवार अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश देखील उपजिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तसेच खर्च देण्यास टाळाटाळ केल्यास गुन्हा दाखल होणार आहे. 

आठ उमेदवारांच्या खर्चात तफावत 
75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात असून या सर्वांनी "ट्रू वोटर' ऍपवर नोंदणी केली आहे. मात्र 80 जणांनी पहिला टप्पा संपून देखील खर्च सादर केला नाही. तसेच ज्या उमेदवारांनी खर्च सादर केला आहे त्या पैकी 8 उमेदवारांच्या खर्चामध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे या उमेदवारांना ही नोटीस बजावली आहे. 
... 
दहा उमेदवारांनी घेतल्या मतदार याद्या 
मनपा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीचे दर 6 ते 15 हजार रुपयांपर्यंतचे होते. त्यामुळे उमेदवारांनी मनपाच्या संकेतस्थळावरुनच याद्या डाऊनलोड करून प्रिंट करून घेतल्या. त्यामुळे तब्बल 290 मतदार याद्या महापालिकेकडे तशाच पडून आहेत. केवळ 10 उमेदवारांनीच या याद्या खरेदी केल्या आहेत. 
 
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation election candidate notice