प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामात जळगाव पिछाडीवर! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

जळगाव ः प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयातील गृहनिर्माण विभागात आज बैठक झाली. दरम्यान, जळगाव महापालिकेकडून गेल्या वर्षभरात योजनेतून झालेल्या कामांवर गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी असमाधान व्यक्त केले. तसेच योजनेचे काम प्रभावी होण्यासाठी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या. 

जळगाव ः प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयातील गृहनिर्माण विभागात आज बैठक झाली. दरम्यान, जळगाव महापालिकेकडून गेल्या वर्षभरात योजनेतून झालेल्या कामांवर गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी असमाधान व्यक्त केले. तसेच योजनेचे काम प्रभावी होण्यासाठी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या. 
आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काची घरे मिळावी, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राज्यासह देशभरात राबविली जात आहे. या योजनेच्या आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आज बैठक झाली. या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अधिकारी, तसेच महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासह राज्यातील अन्य महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते. जळगाव शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम असमाधानकारक असल्याने गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. 

मनपाचे 18 हजार घरांचे उद्दिष्ट 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत "सर्वांसाठी घरे' या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना राबवली जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेचे 18 हजार 61 घरांचे उद्दिष्ट 
आहे. परंतु गेल्या वर्षभरात योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याचे नाराजी बैठकीतून अधिकाऱ्यांनी केली. 

अपूर्ण घरकुलांचा समावेश 
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने घरकुल योजना राबविली होती. 11 हजार 424 पैकी केवळ 1 हजार 550 घरकुले पूर्ण करून त्यांचे वाटप केले. तर 9 हजार 874 घरकुले अपूर्ण अवस्थेत असून, त्यांचा समावेश प्रधानमंत्री आवास योजनेत करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. 

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत बैठक झाली. यात योजनेचे काम प्रभावी होण्यासाठी व गती देण्याबाबत सूचना दिल्या. तसेच अपूर्ण अवस्थेतील घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करता येईल का? याबाबत चर्चा झाली. 
- चंद्रकांत डांगे, आयुक्त, महापालिका. 
 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation gharkul aawas