हुडकोला मनपाकडून हवे तीनशे कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

जळगाव : महापालिकेवरील हुडकोच्या थकीत कर्जाच्या एकरकमी परतफेडीच्या विषयात महापालिकेने सादर केलेला 36 कोटींचा प्रस्ताव "हुडको'ने आज दिल्लीत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत अमान्य केला. तसेच 435 कोटींच्या दाव्यात तडजोड करून तीनशे कोटींवर सहमती दर्शविल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. 

तत्कालीन पालिकेने विविध विकास योजनांसाठी "हुडको'कडून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा बोजा मनपावर आहे. या थकीत कर्जाच्या एकरकमी फेडीबाबत महापालिका व हुडको यांच्यात अनेकदा चर्चा, बैठकाही झाल्यात. मात्र, त्यातून निष्पन्न झालेले नाही. सध्या यासंदर्भातील वाद "डीआरएटी'त प्रविष्ट आहे. 

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 
गेल्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या दौऱ्यात "हुडको'च्या कर्जफेडीबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आज "हुडको'चे संचालक व अधिकाऱ्यांची त्यांनी दिल्लीत बैठक घेतली. यावेळी संचालक श्री. अरोरा, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव प्रवीणसिंह परदेशी उपस्थित होते. बैठकीसाठी आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे स्वतः दिल्लीत होते. मुख्यमंत्र्यांनी "हुडको' अधिकाऱ्यांना या विषयात योग्य मार्ग काढून तो निकाली काढावा, असे निर्देश दिले. मनपाचा 36 कोटींचा कर्जफेडीचा प्रस्तावही "हुडको'ला सादर करण्यात आला. मात्र, हुडकोने तो अमान्य केला. 

हुडकोला 300 कोटी हवे 
हुडकोने मनपास अडीच वर्षांपूर्वी 341 कोटींची डिक्री नोटीस बजावली होती. मनपाने मात्र, मूळ मुद्दल व प्रस्तावित व्याजासह 348 कोटी आतापर्यंत भरल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही सध्या हुडकोच्या दाव्यानुसार 435 कोटी मनपाकडून घेणे निघतात. त्यावर तडजोड करत "हुडको'च्या अधिकाऱ्यांनी आज तीनशे कोटींचा प्रस्ताव पुढे केल्याचे वृत्त आहे. मात्र, या बैठकीतून काहीही निष्पन्न निघू शकले नाही. 

नवी दिल्लीत मुख्यमंत्री व "हुडको'च्या संचालकांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. मनपा व हुडको अशा दोघांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. या विषयाशी संबंधित सर्व न्यायालयीन व कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेता येणार आहे. एका बैठकीत निर्णय होणे शक्‍य नाही, आणखी दोन-चार बैठका होतील. त्यातून सकारात्मक निर्णय नक्की होईल. 
- सुरेश भोळे, आमदार 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation hudko loan