महापौरपदाचा मान कुणाला मिळणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

जळगाव : जळगाव महापालिकेचे महापौरपद महिला ओबीसी गटासाठी राखीव आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे पहिल्या महापौरपदाचा कुणाला मिळणार याची चर्चा आहे. 

जळगाव : जळगाव महापालिकेचे महापौरपद महिला ओबीसी गटासाठी राखीव आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे पहिल्या महापौरपदाचा कुणाला मिळणार याची चर्चा आहे. 
भारतीय जनता पक्षातर्फे ओबीसी गटात ज्येष्ठ नगरसेवक महिलेस संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांचे नाव अग्रेसर आहे. माजी उपमहापौर भारती कैलास सोनवणे तसेच माजी नगराध्यक्ष व माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मातोश्री सिंधूताई कोल्हे यांनाही संधी मिळण्याची शक्‍यता आहे. याशिवाय दीपमाला काळे, रेखा चुडामण पाटील, उज्ज्वला किरण बेंडाळे यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत पक्षातर्फे कोणाचेही नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. आमदार सुरेश भोळे यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, महापौरपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच पक्षात पदाबाबतचा निर्णय वरिष्ठस्तरावरून घेतला जातो. त्यामुळे वरिष्ठस्तरावरून ज्यांचे नाव निश्‍चित होईल, त्यांना ते पद देण्यात येईल.

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation mayer