शिवसेनेचा पाठींब्याने भाजपतर्फे भारती सोनवणेंचा अर्ज दाखल 

bharti sonawane
bharti sonawane

जळगाव : महापौर सीमा भोळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार आजपासून अर्ज दाखल करण्याची सुरवात झाली. यात महापौर पदासाठी भाजपच्या भारती सोनवणे या प्रबळ दावेदार मानल्या जात असून त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे राज्यात युती तुटल्यानंतर महापालिकेत शिवसेनेने त्यांना पाठींबा दिला आहे. 
जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. भाजपचे 57 सदस्य आहेत. तर शिवसेनेचे 14 सदस्य असून मनपा विरोधी पक्षात आहे. तसेच एमआयएमचे तीन सदस्य आहे. महापौर सीमा भोळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. या पदासाठी सोमवारी (ता.27) निवड होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून उद्या (ता. 24) अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे माजी उपमहापौर भारती कैलास सोनवणे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे गटनेते भगत बालाणी, माजी महापौर सीमा भोळे तसेच भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. तर शिवसेनेतर्फे गटनेते नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, विष्णू भंगाळे, अमर जैन आदी उपस्थित होते. 

बिनविरोध करण्याचा प्रयत्न 
महापौर पदासाठी भारती सोनवणे यांची निवड निश्‍चित आहे. ही निवड बिनविरोध करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असून, आज अर्ज भरताना विरोधी पक्षातील शिवसेनेने पाठींबा दिल्यामुळे शिवसेना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे भारती सोनवणे यांची महापौरपदी निवड बिनविरोध मानली जात आहे. भारती सोनवणे यांनी यापुर्वी महापालिकेत उपमहापौरपद भूषविले आहे. आता त्यांची महापौर पदी निवड निश्‍चित झाली आहे. त्यांचे पती कैलास सोनवणे हे मनपात नगरसेवक आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com